esakal | कोरोनाविरोधात लढा देणाऱ्यांसाठी प्रिया मराठेची खास पोस्ट

बोलून बातमी शोधा

Priya Marathe

कोरोनाविरोधात लढा देणाऱ्यांसाठी प्रिया मराठेची खास पोस्ट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

देशात कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरील रूग्णांच्या रूग्णालयांमधील अनुभवांच्या पोस्टमुळे, टिव्हीवरील वाढत्या रूग्णसंख्येच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भितीचे आणि नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी एखादी उत्साह निर्माण करणारी किंवा सकारात्मक सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांची काळजी आणि नैराश्य दूर करण्यास मदत करते. अशीच एक पोस्ट प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेने केली आहे.

प्रिया सध्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेच्या शूटिंमध्ये व्यस्त आहे. या मालिकेत ती सावित्रीबाई देशमुख उर्फ रायबागण ही ऐतिहासिक भूमिका साकारत आहे. मालिकेच्या शूटिंगमधील एका साहसदृष्याचा व्हिडीओ प्रियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती शत्रूसोबत लढताना दिसत आहे. या व्हिडीओला प्रियाने कॅप्शन दिले, ‘आपण सर्वच जण या करोनाविरोधात लढा देत आहोत आणि यात आपण जिंकलो आहोत. हे यश लवकरच सत्यात उतरावं अशी आशा आहे. या कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या सर्वांना शक्ती मिळो.’ प्रियाच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. कोरोनाविरोधी या लढ्यात माणुसकी जिंकेल असा संदेश प्रियाने या व्हिडीओमधून दिला आहे.

हेही वाचा : "बिल्डरच्या मुजोरीमुळे महिनाभरापासून पाणी नाही"; अभिनेत्याचा संताप

प्रियाने छोट्या पडद्यावर तिची विशेष ओळख निर्माण केली आहे, ‘या सुखांनो या’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘तू तिथे मी’ या मराठी मालिकांमधून प्रियाने प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच ‘पवित्र रिश्ता’ आणि ‘साथ निभाना साथिया’ या हिंदी मालिकांमधून प्रिया प्रेक्षकांच्या भेटीस आली.