esakal | होय, मी आहे‌ राष्ट्रभक्त; भारतीय सैन्यावर‌ आक्षेप घेणाऱया तरुणीला प्रियांकाने दिले उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra aggressively answer to the girl who alleged her

”संयुक्त राष्ट्रांची सद्भावना दूत म्हणून तुझी निवड करण्यात आली. मात्र तू पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन देत आहेस. माझ्यासारख्या अनेक लोकांनी अभिनेत्री म्हणून तुला आजवर पाठिंबा दिला आहे,” असं पाकिस्तानी तरुणी प्रियांकाला विचारते.

होय, मी आहे‌ राष्ट्रभक्त; भारतीय सैन्यावर‌ आक्षेप घेणाऱया तरुणीला प्रियांकाने दिले उत्तर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्यावर एका पाकिस्तानी मुलीने हल्लाबोल केला.  भारताने पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तिने यावेळी केला. प्रियांकाने 26 फेब्रुवारीला भारतीय सैन्याबाबत केलेल्या ट्विटवरून त्या तरुणीने सवाल केला. पाकिस्तानमधील बालाकोट येथे भारतीय सैन्याने ‘जैशे मोहम्मद’च्या तळांवर हल्ला केल्यानंतर प्रियांकाने ‘जय हिंद’ असं ट्विट करत भारतीय सैन्याचं कौतुक केलं होतं.

”संयुक्त राष्ट्रांची सद्भावना दूत म्हणून तुझी निवड करण्यात आली. मात्र तू पाकिस्तानविरोधात आण्विक युद्धाला प्रोत्साहन देत आहेस. माझ्यासारख्या अनेक लोकांनी अभिनेत्री म्हणून तुला आजवर पाठिंबा दिला आहे,” असं पाकिस्तानी तरुणी प्रियांकाला विचारते. तिचं पूर्ण ऐकून घेतल्यानंतर प्रियांकाने तिला उत्तर दिले, ”मी भारतीय असून माझे अनेक मित्र पाकिस्तानी आहेत. मला स्वतःला युद्ध व्हावं असं वाटत नाही. पण मी देशभक्त सुद्धा आहे. माझ्या त्या ट्वीटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील मी त्यांची माफी मागते.”

तरुणीच्या ओरडून बोलण्यावर प्रियांका पुढे म्हणते, ”माझ्या मते सर्वांसाठी एक मध्यम मार्ग असतो. तुझ्यासाठीही असेल. पण ज्या पद्धतीने तू माझ्यावर ओरडून बोलत आहेस हे योग्य नाही. आपण इथं प्रेमाच्या भावनेनं एकत्र आलो आहोत.”

‘देसी गर्ल’चा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

loading image