esakal | नवरा असावा तर असा, प्रियंकाला निकनं दिलं खास 'बर्थडे गिफ्ट'
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra gives Suprise gift to Nick Jonas

नवरा असावा तर असा, प्रियंकाला निकनं दिलं खास 'बर्थडे गिफ्ट'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आता प्रियांका केवळ बॉलीवूड पुरतीच मर्यादित राहिली नाही. ती हॉलीवूडमध्येही प्रसिद्ध आहे. ती आणि तिचा पती निक जोन्स यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी ऑस्कर पुरस्कारांची घोषणा केली होती. सोशल मीडियावर ती यादी जाहीर करण्याचा मान त्यांना मिळाला होता. नुकताच प्रियंकाचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. तिला तिच्या चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या. तिच्या पुढील प्रवासासाठी अभिष्टचिंतनही केले. यासगळ्यात प्रियांकाच्या पतीनं म्हणजे निकनं तिला काय स्पेशल गिफ्ट दिलं याची चर्चाही मोठ्या प्रमाणावर झाली. (priyanka chopra birthday nick jonas gift expensive bottle of wine to wife price leave you shocked yst88)

सध्या निकनं प्रियांकाला दिलेल्या गिफ्टची मोठी चर्चा होतेय. प्रियांकाच्या 39 व्या जन्मदिनानिमित्तानं तिला निकनं मोठं गिफ्ट दिलंय. निकनं प्रियंकाला एक महागडी वाईन्सची बॉटल दिली आहे. त्याची किंमत प्रचंड आहे. निकनं आपल्या इंस्टावर त्या वाईनच्या बॉटल्सचा एक फोटोही शेयर केला आहे. त्यावर Chateau Mouton Rothschild 1982 असे लिहिले आहे. त्यामुळे त्या वाईनची बॉटल किती महाग असेल याचा अंदाज आपण लावू शकतो.

प्रियंकानं निकला एक पोस्ट टॅग केली आहे. त्यात तिनं हार्ट शेपचा इमोजीही शेयर केला आहे. तिनं सांगितलं आहे की, मला माझ्या पतीनं खास भेट पाठवली आहे. त्या नोटमध्ये निकनं लिहिलं आहे की, तुला जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तु जगातील प्रत्येक आनंदाच्या क्षणाची साक्षीदार व्हावी अशी माझी इच्छा आहे. मी आज आणि उद्याही तुझ्यावर खूप प्रेम करत राहील यात शंका नाही. त्यानंतर त्याच्या महागड्या गिफ्टचा फोटोही आला आहे.

हेही वाचा: चुनरी चुनरी गाण्यावरचा भन्नाट 'बेले डान्स' पाहिलायं?; एकदा पाहाच!

तुम्हाला सांगावं लागेल ते म्हणजे निकनं प्रियांकाला दिलेल्या वाईनच्या बॉटलची किंमत ही तब्बल 1 लाख 31 हजार रुपये एवढी आहे. त्या वाईनचे नाव Chateau Mouton Rothschild 1982 असे आहे. या वाईनची निर्मिती Cabernet Franc याठिकाणी केली जाते.

loading image