esakal | चुनरी चुनरी गाण्यावरचा भन्नाट 'बेले डान्स' पाहिलायं?; एकदा पाहाच !
sakal

बोलून बातमी शोधा

चुनरी चुनरी गाण्यावरचा भन्नाट 'बेले डान्स' पाहिलायं?; एकदा पाहाच!

चुनरी चुनरी गाण्यावरचा भन्नाट 'बेले डान्स' पाहिलायं?; एकदा पाहाच!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

आतापर्यत या व्हिडिओला 48 लाख व्ह्युज मिळाले आहेत. यावरुन त्या गाण्यात त्या तिघींनी केलेल्या डान्सची कल्पना करता येईल. बीवी नं1 मध्ये बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आणि सुष्मिता सेन यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमधील खासकरुन 90 च्या दशकातील गाणे जास्त प्रसिद्ध होताना दिसतात. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स तयार केले जातात. सोशल मीडियावर तरुणाई त्या गाण्यांच्या प्रेमात असल्याचे दिसुन आले आहे.

90 च्या दशकांतील गाण्यांची क्रेझ तरुणांमध्ये दिसून येते. जय मॉ भवानीच्या वतीनं एक व्हिडिओ युट्युबवर रिलिज करण्यात आला आहे. त्या व्हि़डिओनं सध्या सोशल मीडियावर एक गाणं प्रदर्शित केलं आहे. त्या व्हिडिओमध्ये तीन मुली चुनरी चुनरी नावाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. तिन्ही मुलींनी बेले डान्स केला आहे. तो इतका प्रभावी आहे की, आपण त्यांचा तो डान्स पाहतच राहतो. म्हणून तर प्रेक्षकांची मोठया प्रमाणावर त्या गाण्याला पसंती मिळाली आहे.

हेही वाचा: 'प्रेग्नंट होते,अंगदला झाला होता कोरोना; नेहाचा धक्कादायक अनुभव

वास्तविक तो व्हिडिओ गेल्या वर्षी जानेवारी मध्ये अपलोड करण्यात आला होता. आतापर्यत हा व्हिडिओ 48 लाखवेळा पाहिला गेला आहे. जेव्हा सुश्मितानं या गाण्यावर डान्स केला होता तेव्हा प्रेक्षकांना तिचा डान्स कमालीचा आवडला होता. मात्र आता या गाण्यावर बेली डान्सचे जे वेगळे व्हर्जन व्हायरल झाले आहे ते अनेकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

loading image