प्रियांका चोप्रा जगभरात दाखवणार देसी कंटेंट, ऍमेझॉन प्राईमसोबत केली लाखो डॉलर्सची डील

टीम ई सकाळ
Wednesday, 1 July 2020

प्रियांका चोप्राने ऍमेझॉन प्राईमसोबत दोन वर्षाची लाखो डॉलर्सची डिल केली आहे. या डिलला मल्टिमिलियन-डॉलर फर्स्ट-लूक टेलिव्हिजन डील नाव दिलं गेलं आहे.

मुंबई- अभिनेत्री-निर्माती प्रियांका चोप्रा जगभरातील टेलिव्हिजनवर आधीपासूनंच देशाचं प्रतिनिधित्व करत आहे. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार प्रियांका चोप्राने ऍमेझॉन प्राईमसोबत दोन वर्षाची लाखो डॉलर्सची डिल केली आहे. या डिलला मल्टिमिलियन-डॉलर फर्स्ट-लूक टेलिव्हिजन डील नाव दिलं गेलं आहे. प्रियांकाने ही डिल साईन केल्याचं कळतंय. याद्वारे ती जगभरात टीव्ही विश्वात देसी कंटेट घेऊन येणार आहे. 

हे ही वाचा: आमीर खानच्या आईचा कोरोना रिपोर्ट आला समोर

प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. तिने लिहिलं आहे की, 'अभिनेत्री आणि निर्माती असल्या कारणाने मी नेहमीच भाषा आणि भौतिक गोष्टींव्यतिरिक्त एक मोठी गोष्ट बनवण्यासाठी जगभरातून येणा-या टॅलेंटला मोठ्या कॅनवासवर उतरवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. माझं पर्पल पेबल पिक्चर्स या प्रोडक्शन हाऊसचं हे स्वप्न होतं आणि आम्ही ऍमेझॉन सारख्या प्लॅटफॉर्मसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहोत.'

प्रियांकाने म्हटलंय, 'एका कथाकाराच्या रुपात मी नवीन कल्पना शोधण्याचा प्रयत्न करत असते. ज्याचा उद्देश केवळ मनोरंजन नसून त्यापेक्षा  जास्त गरजेचं आहे ते म्हणजे लोकांचा मेंदू जागृत करेल आणि त्यांच्या विचारांना योग्य दिशा देईल. मी माझ्या २० वर्षांच्या करिअरकडे पाहते, जवळपास ६० सिनेमांनंतर, मी आशा करते की मी ते मिळवण्याासाठी योग्य मार्गावर आहे.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

प्रियांका आधीपासूनंच ऍमेझॉनच्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे. पहिला रिऍलिटी डान्स शो 'संगीत' आहे जो ती पती निक जोनाससोबत निर्मित करत आहे. तर दुसरा प्रोजेक्ट 'एंथोनी एँड जोए रुसोस सिटाडेल' आहे जो एक स्पाय ड्रामा असेल. यामध्ये 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि 'बॉडीगार्ड'चा रिचर्ड मैडन मुख्य भूमिकेत आहे.  

priyanka chopra deal with amazon prime two year multimillion dollar first look television deal  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priyanka chopra deal with amazon prime two year multimillion dollar first look television deal