या कारणामुळे प्रियंका चोप्राने ‘फेअरनेस क्रीम’च्या जाहिराती करणं सोडलं

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

लाहनपणी त्वचेच्या रंगावरुन चिडवण्यात आल्याचा प्रियंकाने खुलासा केला. 

मुंबई : अमेरिकेत जॉर्ज प्लॉयड याच्या मृत्यूनंतर जोरदार विरोध प्रदर्शने केली जात आहेत, या विरोधादरम्यान वर्णभेदाविरुध्द अभियान चालवण्यात येत आहे. बॉलिबुडच्या काही सेलिब्रेटींनी देखील यात सहभाग नोंदवला होता. पण पुर्वी रंग गोरा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रीमच्या जाहिराती केलेल्या असल्यामुळे त्यांना जोरदार ट्रोल करण्यात येत आहे. बॉलिवुड अभिनेत्री प्रियंका चोप्राला देखील याच कारणासाठी ट्रोल करण्यात आले आहे. या दरम्यान प्रियंकाचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्या व्हिडीओत ती फेअरनेस क्रिम च्या जाहीराती करणे का बंद केले ते सांगत आहे. 

अखेर ठरलं! या तारखेपासून मराठी रामायणाचे प्रसारण सुरू होणार

या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियंकाला फेअरनेस प्रॉडक्ट्सचे समर्थन करण्याबद्दल तुला काय वाटते असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ती म्हाणाली की, “पंजाबी परिवारातील माझी सगळी भांवंडे ही रंगाने गोरी होती, फक्त मी एकटीच सावळया रंगाची असल्याने चेष्ठा करताना कुटूबातील सर्वजण काळी म्हणून हाका मारत, 13 वर्षांची असताना क्रीम वापरुन गोरी होण्याची माझी इच्छा होती.”

कतरिनाचा समुद्रात माशासोबत पोहतानाचा व्हिडीओ व्हायरल..पाहा व्हिडीओ

अभिनेत्रीने खुलासा केला की, “मी जेव्हा चित्रपटक्षेत्रात काम करण्यासाठी आली तेव्हापासून ठरवले होते की आपण आहोत तसे सुंदर आहोत. त्यामुळे फेअरनेस क्रिमच्या जहिरातीमध्ये काम करायचे नाही.” प्रियंका म्हणाली की, “मी एक वर्ष रंग गोरा करण्यासाठीच्या क्रिमच्या जाहिरातींमध्ये काम केले. पण नंतर ते चूक असल्याचे मला कळलं. मी देखील सुंदर आहे, माझ्यासारखा रंग असणे देखील ठिक आहे याची मला जाणीव झाली. तशा जाहीराती करण्याची इच्छा पहिल्यापासूनच नव्हती, त्यामुळे मी त्यानंतर कधीच तशा जाहिराती केल्या नाहीत.” 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka chopra explained why she stopped endorsing fairness products

टॉपिकस
Topic Tags: