esakal | Video : प्रियांका-निकच्या घरी आलाय नवा पाहुणा! बघा कोण?
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra gives Suprise gift to Nick Jonas on marriage anniversary

1 डिसेंबरला प्रयांका-निकच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. याचनिमित्ताने प्रियांकाने निकला एक सरप्राईज गिफ्ट दिलंय.. त्यांच्या कुटूंबात एक मेंबर आलाय.. काय आहे हे गिफ्ट?

Video : प्रियांका-निकच्या घरी आलाय नवा पाहुणा! बघा कोण?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

प्रियांका चोप्राने निक जोनासशी लग्न केल्यापासून ती काही ना काही कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा हे क्यूट कपल चर्चेत आलंय. कारणंही तसंच काही खास आहे. 1 डिसेंबरला त्या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होईल. याचनिमित्ताने प्रियांकाने निकला एक सरप्राईज गिफ्ट दिलंय.. त्यांच्या कुटूंबात एक मेंबर आलाय.. काय आहे हे गिफ्ट? 

‘नो एन्ट्री’मधून सलमानची एक्‍झिट

निकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर करत या सरप्राईजचं कौतुक केलंय. प्रियांकाने निकला एक कुत्रा भेट दिलाय. 'प्रियांकाने मला सकाळी सकाळी हा कुत्रा आणून सरप्राईज दिले. आमच्या घरातील या नव्या पाहुण्याला भेटा. याला पाहून मला खूप आनंद झालाय, सकाळपासून माझ्या चेहऱ्यावरचं हसूच कमी होत नाहीये... थँक यू प्रियांका!' असं कॅप्शन निकने या पोस्टला दिलंय. या व्हिडिओमध्ये निक झोपला आहे आणि प्रियांका एक कुत्रा घेूऊन येते आणि निकवर सोडून देते. निकला काय चाललंय हे काहीच समजत नाही आणि नंतर त्याला हे सरप्राईज असल्याचं कळतं. निक-प्रियांकाने या कुत्र्याचं नाव गिनो जोनास असं ठेवलंय. तर त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही सुरू केलंय.   

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मागच्या वर्षी 1 डिसेंबरला निक-जोनासचा विवाह संपन्न झाला. राजस्थानमधील जोधपूर येथील उमेद भवन येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. निक हा अमेरिकन गायक असून त्या दोघांचा हा प्रेमविवाह होता. 

loading image