esakal | इस्लामविषयी वक्तव्य करणं प्रियांकाला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

इस्लामविषयी वक्तव्य करणं प्रियांकाला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

'त्या' वक्तव्यामुळे प्रियांका झाली ट्रोल

इस्लामविषयी वक्तव्य करणं प्रियांकाला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

देसी गर्ल ते क्वांटिको गर्ल असा प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा. केवळ बॉलिवूडच नव्हे, तर हॉलिवूडमध्येदेखील प्रियांकाने तिच्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. त्यामुळे आज प्रियांका ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाते. अलिकडेच प्रियांकाचं 'अनफिनिश्ड'  हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात तिने तिच्या जीवनातील अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे प्रियांका सध्या सातत्याने चर्चेत येत आहे. यामध्येच तिची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'अनफिनिश्ड'  या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी अलिकडेच तिने  ओपरा विंफ्रेच्या टॉक शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने मुस्लिम धर्माविषयी एक भाष्य केलं होतं. ज्यामुळे तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे. नेटकऱ्यांनी प्रियांकाला ट्रोल करत चांगलंच धारेवर धरलं आहे.

प्रियांकाने सहभाग घेतलेल्या ओपरा विंफ्रेच्या टॉक शोचा एक प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांका भारतातील सर्व धर्माविषयी  भाष्य करताना दिसत आहे. यात तिने  इस्लाम धर्माविषयी तिचं मत मांडलं. माझे वडील मस्जिदमध्ये गाणं गायचे. त्यामुळे मला मुस्लिम धर्माविषयीदेखील माहिती आहे,असं प्रियांका म्हणाली. तिच्या या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

'मस्जिदमध्ये गाणं गाण्याची परवानगी मिळते?', असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, तुझे वडील मस्जिदमध्ये गाणं गायचे तर, 'प्लीज मला त्या मस्जिदचं नाव सांग', असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. इतकंच नाही तर, अनेक युजर्सने या मुद्द्यावरुन भन्नाट मीम्स व्हायरल केले आहेत.

नेमकं काय म्हणाली प्रियांका?

"मी हिंदू आहे. मी प्रार्थना करते. माझ्या घरी देवाचे मंदिर आहे. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेमधून झाले आहे. त्यामुळे मला ईसाई धर्माबाबत देखील माहीत आहे.' वडिलांबद्दल सांगताना प्रियांका म्हणाली, 'माझे वडील मस्जिदमध्ये गाणं गात होते. त्यामुळे मला मुस्लिम धर्माची देखील महिती आहे. भारतामध्ये आध्यात्माचे महत्व जास्त आहे. आपण त्याकडे दुर्लक्ष करू." 
 

loading image