Priyanka Chopra:'लखनऊमध्ये संध्याकाळी सातनंतर बाहेर पडणं म्हणजे..',महिलांच्या सुरक्षेवर प्रियांकाची नोट Bollywood Actress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Priyanka Chopra Shares Her Concern On Women’s Safety In Uttar Pradesh

Priyanka Chopra:'लखनऊमध्ये संध्याकाळी सातनंतर बाहेर पडणं म्हणजे..',महिलांच्या सुरक्षेवर प्रियांकाची नोट

Priyanka Chopra: देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या भारत भेटीनंतर नुकतीच अमेरिकेला परतली आहे. मोठ्या काळानंतरप्रियांका भारतात आली होती. त्यामुळे तिचा हा भारत दौरा चांगला चर्चेत होता. मायदेशात आली असती तरी प्रियांका तिच्या कामांमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं. मुंबईत तिने तिच्या हेअर केअर ब्रँड ॲनोमालीचं प्रमोशन केल्यानंतर थेट उत्तर प्रदेश गाठलं. (Priyanka Chopra Shares Her Concern On Women’s Safety In Uttar Pradesh)

हेही वाचा: Malaika Arora: अर्जुन-मलायका बोहल्यावर?, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण...

युनिसेफ इंडियाची ॲम्बेसिडर असल्यामुळे प्रियांका उत्तर प्रदेशमधील खेड्यांमध्ये ही फिरताना दिसली. तिथे तिने वेगवेगळ्या संस्थांची भेट घेतली. काही शिक्षण संस्थांना भेट देत तिने मुलांचं शिक्षण, त्यांच आरोग्य, पोषण तसंच सुरक्षिततेच्या बाबतीत झालेल्या कार्याचा आढावा घेतला. केवळ विद्यार्थीच नव्हे तर प्रियांकाचोप्राने महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी 24 तास कार्यरत असलेल्या कंट्रोल रूमला ही भेट दिली.

हेही वाचा: Jaya Bachchan यांनी सर्वांसमक्ष कंगनाकडं फिरवली पाठ, अभिषेकनं वेळीच प्रकरण सावरलं, व्हिडीओ व्हायरल...

प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत यूपी मधील महिला आणि मुलांना मदत करणाऱ्या 1090 वुमन पॉवर लाईन (WPL) बद्दल एक नोट शेअर केलीय.प्रियांकाने शेअर केलेल्या व्हिडिओत ती महिला पोलीस अधिकाऱ्याला प्रश्न विचारते. " मला उत्तर प्रदेश बद्दल काही सांगा. मी देखील लखनऊमध्ये राहिलीय. इथे एक प्रकारची भीती आहे खास करून संध्याकाळी सात वाजल्यानंतर."

यानंतर महिला पोलीस अधिकारी नीरा रावत यांनी प्रियांकाला मध्येच थांबवलं. "मी तुम्हाला डेटा दाखवते" असं म्हणत त्यांनी तिला कंट्रोल रूम मध्ये नेलं. कंट्रोल रूममधून कशा प्रकारे कार्य चालतं याची माहिती त्यांनी प्रियांकाला दिली. नव्या तंत्रज्ञानामुळे मदतकार्य आता जलद आणि सोपं झाल्याचं पाहून प्रियांकाने आनंद व्यक्त केला.

हेही वाचा: Alia Bhatt Discharged: हॉस्पिटलमधून घरी परतली आलिया, रणबीरच्या कुशीत चिमुकलीची पहिली झलक...

प्रियांकाने व्हिडिओ सोबतच कॅप्शन मध्ये एक नोट शेअर केली आहे. यात तिने कंट्रोल रूमला भेट देण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. भारतातील महिला आणि मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल ती म्हणाली, " पक्षपातीपणा आणि भ्रष्टाचाराच्या भीतीमुळे बर्‍याच महिला आणि मुले तक्रार करत नाहीत. मला आशा आहे की अशा हेल्पलाईनमुळे ते करू शकतील. महिलांच्या सुरक्षेसाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे, परंतु असे उपक्रम ही एक चांगली सुरुवात आहे आणि जर ती प्रभावीपणे अंमलात आणली गेली तर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला नक्की आळा घालता येईल."