
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं बॉलिवूड पासून हॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास केला. पण सुरवातीला इथं पोहोचण्यासाठी तिला दिवसरात्र मेहनत करावी लागली आहे. तिच्या कुटुंबात कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसताना प्रियांकाने या इंडस्ट्रीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं. मिस वर्ल्ड किताब जिंकल्यावर प्रियांकाने तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली.
अक्षय कुमारच्या ‘द हिरो : लव्ह स्टोरी ऑफ स्पाय’ मधून तिनं बॉलिवूड पदार्पण केलं. त्यानंतर ती अक्षयसोबत अंदाज या सिनेमातही दिसली होती. तसेच २००३ साली रिलीज झालेल्या राज कंवर यांच्या अंदाज सिनेमात प्रियांकानं खूप महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. पण शूटिंगवेळी असं काही घडलं होतं जे प्रियांका अद्याप विसरलेली नाही.
सिनेमाच्या गाण्याचं शूटिंग सुरू होतं आणि त्यावेळी कोरिओग्राफर राजू खान हे प्रियांकावर सर्वांसमोर खूप ओरडले होते. याचा किस्सा प्रियांकानं एका मुलाखतीत सांगितला ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये प्रियांका सांगत आहे की, अंदाजच्या या गाण्याच्या शूटिंगसाठी मी साउथ आफ्रिकेला गेले होते. तिथं एक रोमँटिक गाणं होतं. राजू खान कोरिओग्राफ करत होते. ४० रिटेक होऊनही मला व्यवस्थित डान्स करता येत नव्हता. हे पाहिल्यावर राजू खान माझ्यावर खूप नाराज झाले, त्यांनी माइक जागेवरच आपटला आणि म्हणाले, ‘तू मिस वर्ल्ड झालीस म्हणजे तू अभिनेत्री होशील असं वाटतं का तुला? पहिलं जा, डान्स शिक आणि पुन्हा येऊन परफॉर्म कर.’
तसेच यावेळी प्रियांका पुढे म्हणाली, त्यावेळी अक्षयची पत्नी ट्विंकल प्रेग्नन्ट होती. ज्याचा फायदा मला झाला. शूटिंग काही दिवसांसाठी थांबवण्यात आलं. त्यावेळी मला तयारी करायला वेळ मिळाला. मी पंडित वीरू कृष्णन यांच्याकडे जाऊन कथ्थक शिकायला सुरुवात केली. मी रोज सहा-सहा तास प्रॅक्टिस करत होते आणि जेव्हा मी पुन्हा सेटवर परतले त्यावेळी मला पूर्वी पेक्षा चांगला डान्स येत होता. त्यापुढील दिवसांपासून प्रियांका चोप्राला व्यवस्थित डान्स करण्यास सुरुवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.