प्रियंका चोप्राचा जंम्पसूट अंदाज रेड कार्पेटसाठी नसूनही चर्चेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

प्रिंसेस लेडी डायना यांच्या लूकवरुन प्रियंका चोप्राचा हा लूक प्रभावित होता. हा व्हाइट जंम्पसूट रेड कार्पेटवर चालण्याआधी तिने परिधान केला होता.

कांस 2019 महोत्सव सध्या चर्चेत आहे. या महोत्सवात आतापर्यंत कंगना राणावत, दीपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा आणि हिना खान या अभिनेत्रींनी आपले जलवे दाखविले आहे. पण या सर्वांमध्ये नजरा टवकारल्या त्या म्हणजे देसी गर्ल प्रियंकाच्या व्हाइट जंम्पसूटकडेच. हा जंम्पसूट तिने रेड कार्पेटसाठी घातला नव्हता. 

प्रिंसेस लेडी डायना यांच्या लूकवरुन प्रियंकाचा हा लूक प्रभावित होता. हा व्हाइट जंम्पसूट रेड कार्पेटवर चालण्याआधी तिने परिधान केला होता. प्रियंकाने डायना यांच्या फोटोची एक पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. डायना यांच्याशिवाय प्रियंकाने सोफिया लॉरेन, प्रिंसेस मोनाको, ग्रेस कैली यांचे फोटोही पोस्ट केले आहेत. 26 वर्षाच्या असताना प्रिंस चार्ल्स सोबत प्रिंसेस डायना कांस महोत्सवात पहिल्यांदा सामिल झाल्या होत्या. फॅशन डिझायनर कॅथरिन वॉकर यांनी डिझाइन केलेला गाउन डायना यांनी त्यावेळी परिधान केला होता.  

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@red #5BFilm

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

 
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@red #5BFilm

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@red #5BFilm

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Chopras jumpsuit style is in the discussion at Cannes 2019