प्रियांका आणि निकच्या घटस्फोटाच्या बातम्या अफवा

वृत्तसंस्था
सोमवार, 1 एप्रिल 2019

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास याचा लग्न सोहळा चांगलाच चर्चेत आला होता. पण त्यांच्या लग्नाला काही महिने झाले असतानाच त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या देखील यायला सुरुवात झाली होती. परंतु, या सगळ्या अफवांना प्रियांकाने पूर्णविराम दिला आहे. तिने एक इन्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. तिने पहिल्यांदाच जोनास बदर्सची कॉन्सर्ट अटेंड केली. त्याची पोस्ट तिने रविवारी शेअर केली आहे. 

आपल्या पोस्टमध्ये तिने जोनास ब्रदर्स बरोबरचा फोटो शेअर केला आहे. याबाबत लिहिताना तिने म्हटलं आहे, ''माझा पहिला जोनास ब्रगर्स शो, हे खूप अविश्वसनीय आहे, मला या सर्वांचा अभिमान आहे''.

My first ever #jonasbrothers show. And it was incredible!!! I’m so proud of these guys!! #Family

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

सुत्रांच्या माहितीनुसार, प्रियांकाच्या घटस्फोटाच्या या वृत्ताची सुरूवात एका मासिकातून झाली आहे. अमेरिकेत प्रसिद्ध होणाऱ्या एका मासिकामध्ये निक आणि प्रियांकामध्ये काही अलबेल नसल्याचे वृत्त पहिल्यांदा छापून आले. या मासिकात प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की, प्रियांका आणि निकमध्ये सध्या लहान-लहान गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. निक प्रियांकाच्या लग्नाला 4 महिने पूर्ण होत असतानाच या मासिकात छापून आलेल्या बातमीने त्यांच्या घटस्फोटाची अफवा पसरली आहे.

'ओके' नावाच्या या मासिकात, निकच्या मते, त्याने हे लग्न खूप घाईघाईत केले आणि लग्नाच्यावेळी त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की, प्रियांका खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. त्यामुळे निकने प्रियांकाशी घटस्फोट घ्यावा असे जोनस कुटुंबियांना वाटत असल्याचे म्हटले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyankas divorce news are rumors