'तिचा रडवेला आवाज ऐकतो तेव्हा, मलाही रडू येतं; मुलगी अजूनही हॉस्पिटलमध्ये'

producer and director satish kaushik daughter vanshika is in hospital actor saif please pray for her
producer and director satish kaushik daughter vanshika is in hospital actor saif please pray for her
Updated on

मुंबई - बॉलीवूडमध्ये कोरोना वेगाने वाढत आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडसाठी कोरोना ही धोक्याची घंटा ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे मोठमोठे सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यांनी आता आपले प्रोजेक्ट सोडून घरीच विश्रांती घेणे पसंद केले आहे. साधारण आठवडाभरापूर्वी प्रसिध्द निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांना कोरोना झाला होता. आणि ते रुग्णालयात भरती झाले होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. मात्र त्यांची आठ वर्षाची मुलगी वंशिका ही अद्याप रुग्णालयात आहे. त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे. गेल्या पाच दिवसांपासून ती अॅडमिट आहे. कौशिक यांना यामुळे कमालीच्या वेदना होत आहेत.

कोरोनाचा वाढता कहर सर्वांसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. मागील महिनाभरापासून त्याचा प्रभाव वाढला आहे. आरोग्य प्रशासनानं युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यात कधीही लॉकडाऊन होऊ शकते. अशी परिस्थिती आहे. अद्याप त्यावर शासकीय पातळीवरुन कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र नागरिकांनी सामाजिक सुरक्षेचे नियम पाळावेत असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. बॉलीवूडमधील कलाकारांना होणारी कोरोनाची लागण चिंतेचा विषय ठरत आहे. त्याचे कारण म्हणजे सध्या मोठ्या प्रमाणात अनेक चित्रपटांचे चित्रिकरण सुरु आहे. अशावेळी त्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला झालेला कोरोना त्याचा परिणाम सर्व क्रुवर होताना दिसत आहे.

दिग्दर्शक सतीश कौशिक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले होते. काही दिवसांनी कौशिक यांच्या मुलीला कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याविषयी अधिक माहिती देताना कौशिक यांनी सांगितले की, मी बरा होतो आहे. आता घरी जाईल. मात्र मला माझ्या मुलीची काळजी वाटत आहे. ती गेल्या पाच दिवसांपासून रुग्णालयात आहे. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण तिचं टेम्परेचर काही केल्या कमी होत नाही. याची चिंता वाटते. तुम्ही सगळ्यांनी तिच्यासाठी प्रार्थना करा. असे आवाहन कौशिक यांनी केलं आहे..

कोविडचे काही खरे नाही. हे मला तुम्हाला सांगायचे आहे. त्याचा कसलाच अंदाज येत नाही. कधी काय होईल याचा भरवसा नाही. वंशिकाचं टेम्परेचर सुरुवातीला 100 त्यानंतर 101 झालं. फोनवर ज्यावेळी तिचा रडवेला झालेला आवाज ऐकतो तेव्हा मला रडू येतं. त्यामुळे माझी चिंता वाढली आहे. देव तुम्हा सगळ्यांना आणि तुमच्या मुलाबाळांना सुखा समाधानात ठेवो. अशी माझी त्याच्याकडे प्रार्थना.   

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com