esakal | अनिल कपूरची पोरगी म्हणे, 'बिकीनी घालून फोटोशूट केलं, काय फरक पडतो?'
sakal

बोलून बातमी शोधा

 producer fashion rhea Kapoor bikini photos anil Kapoor younger daughter share hot photo

रियानं आपल्या इंस्टाग्रामवर बिकिनी फोटोशूट केले आहेत. ते फोटो शेअर करताना तिनं लिहिलं आहे की,

अनिल कपूरची पोरगी म्हणे, 'बिकीनी घालून फोटोशूट केलं, काय फरक पडतो?'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता अनिल कपूरची छोटी मुलगी आणि सोनम कपूरची लहान बहिण रिया कपूर आता सोशल मीडियावर फेमस झाली आहे. ती वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. रियाला लाईम लाईट पासून लांब राहणे आवडते. मात्र तसे असले तरी इतर सोशल मीडियावर तिला फॉलोअर्स करणा-यांची संख्या मोठी आहे. आता ती वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तसेही बड्या कलाकारांची मुले म्हटल्यावर त्यांचे शौकही मोठेच असतात. त्यांनी काय केले तरी ते चाहत्यांना आवडून जाते. रियाला बॉलीवूडमध्ये यायचे की नाही हा प्रश्न दुय्यम असला तरी तिच्या फोटोशूटमुळे तो प्रश्न तिला चाहत्यांनी विचारायला सुरुवात केली आहे.

रियानं आपल्या इंस्टाग्रामवर बिकिनी फोटोशुट केले आहेत. ते फोटो शेअर करताना तिनं लिहिलं आहे की, मी फार जाडी होते. रिया नेमकी कशी आहे हे त्या फोटोतून पाहायला मिळत आहे. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली आहे. रियानं बिकिनी फोटो शेअर करताना असे लिहिले आहे की, मला वाटलं होतं की मी जाडी आहे, आणि आपण आपल्याशी कसे जिंकु शकतो. असा प्रश्न मला पडला होता. मात्र आपण प्रयत्न करु शकतो. जसं की टीना आपल्याला सांगते, तुम्ही सुंदरतेच्या काही नियमांचा विचार करायला हवा. तो जास्त महत्वाचा आहे. आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी काळजी घ्यायला पाहिजे. अनेक नियम, अटी त्याच्या आड येतात. मात्र तरीही सुदृढ राहण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा.

जर तुम्हाला सुंदर दिसत असाल तर बाकी कोण काय म्हणते याचा विचार करण्याची गरज नाही. त्यांची चिंताही करु नका. अशा प्रकारची प्रतिक्रिया रियानं शेअर केली आहे. रियाच्या प्रतिक्रियेवरुन असे वाटत आहे की, तिचे फोटो थ्रो बॅक आहेत. ज्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. तिचं भरभरुन कौतूक केलं आहे. काहींनी तिला कमेंटही दिली आहे ती म्हणजे आता तो अजिबात जाडी वाटत नाही. खुप सुंदर दिसते आहेस. ग्रे कलरच्या बिकीनीमध्ये रिया कमालीची सुंदर दिसते आहे.

रियाविषयी आणखी काही सांगायचे झाल्यास, रिया एक निर्माती असण्याबरोबरच ती फॅशन डिझायनरही आहे. रियानं आपल्या करिअरची सुरुवात वेकअप सीड पासून केली होती. 2010 मध्ये सोनम कपूर आणि अभय देओल यांच्या आयशा नावाच्या चित्रपटाची निर्मितीही तिनं केली होती. त्यानंतर तिनं खुबसुरत आणि वीरे दी वेडिंग सारखे चित्रपट केले आहेत.  
 
  

loading image