Sanjay Jadhav : तेरी मेरी यारी मग...! आता पुन्हा 'दुनियादारी' |Punha Duniyadari Marathi Director Sanjay Jadhav | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Punha Duniyadari news

Sanjay Jadhav : तेरी मेरी यारी मग...! आता पुन्हा 'दुनियादारी'

Punha Duniyadari: मराठी चित्रपट विश्वामध्ये काही चित्रपटांनी मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यामध्ये संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी या (social media news) चित्रपटाचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. या चित्रपटानं मराठी बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. मराठीतील प्रसिद्ध कादंबरीकार (suhas shirwalkar) सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या लोकप्रिय कादंबरीवर जाधव यांनी चित्रपट निर्मिती केली होती. मराठी चित्रपटांमधील आवर्जुन पाहावेत अशा चित्रपटांमध्ये दुनियादारीचे नाव नेहमीच घेतले जाते. विशेषत, तरुणाईच्या पसंतीचा हा चित्रपट होता.

नऊ वर्षांपूर्वी दुनियादारी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता त्याचा दुसरा भाग (entertainment news) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक जाधव यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी येत्या काळात पुन्हा दुनियादारी अशी पोस्ट करुन चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. त्यांच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. काही वर्षांपासून दुनियादारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असे सांगण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव तो प्रोजेक्ट पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे पुन्हा मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला होता. याचा परिणाम येणाऱ्या काही कलाकृतींना बसला होता.

आता संजय जाधव यांनी इंस्टावरुन शेयर केलेल्या त्या पोस्टला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, २०१३ साली प्रेक्षकांनी ज्या चित्रपटाला भरपूर प्रेम दिलं ! अशी दुनियादारी आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेरी मेरी यारी ...चल करू दुनियादारी म्हणत प्रत्यक्षात ते मैत्रीचे क्षण आमच्या सोबत जगले. ते जग , ती मैत्री , ते प्रेम आणि तीच दुनियादारी आता पुन्हा घेऊन आलोत मैत्रीच्या नव्या ढंगात आणि प्रेमाच्या नवीन रंगात.

हेही वाचा: Pradeep Patwardhan: ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन काळाच्या पडद्याआड

एका नव्या युगाची , नवीन रंगाची न्यु एज ईस्टमन कलर लव्हस्टोरी, तेरी मेरी यारी ... आता 'पुन्हा दुनियादारी' !!! अशा शब्दांत संजय जाधव यांनी पोस्ट केली आहे. दुनियादारीच्या पहिल्या भागात स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानिटकर, जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले होते. त्यातील गाणी, संवाद हे कमालीचे लोकप्रिय झाले होते.

हेही वाचा: Pradeep Patwardhan: 'मोरूची मावशी' शेवटपर्यत प्रेक्षकांच्या मनात!

Web Title: Punha Duniyadari Marathi Director Sanjay Jadhav Share Insta Post Next Part Box Office Hit Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..