गुरु रंधवाच्या नाकातून आलं रक्त; कश्मिरच्या जीवघेण्या थंडीत सुरु होतं शुटिंग

Punjabi singer guru Randhawa shoot in Kashmir photo goes viral on internet
Punjabi singer guru Randhawa shoot in Kashmir photo goes viral on internet

मुंबई - काश्मिरला या दिवसांत फिरायला जाणा-यांची संख्या काही कमी नाही. काश्मिरचं सौंदर्य अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक त्याठिकाणी गर्दी करतात. बॉलीवूडलाही यावेळी चित्रिकरणाचा मोह आवरत नाही. पंजाबी गायक गुरु रंधवा हा आता सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. याचे कारण म्हणजे त्याचा व्हायरल झालेला फोटो. नाकातून रक्त येत असल्याचा त्याचा फोटो चर्चेचा विषय ठरतो आहे. तो काश्मिरला चित्रिकरणासाठी गेला होता. त्यावेळी त्याला तिथं जीवघेण्या थंडीचा सामना करावा लागला.

पंजाबी गायक आणि अभिनेता गुरु रंधावा याची लोकप्रियता मोठी आहे. त्याचे चाहते जगभरात सगळीकडे पसरले आहेत. काश्मिरमध्ये चित्रिकरण करण्यासाठी मात्र रंधावाला मोठ्या प्रसंगाला सामोरं जावे लागले आहे. त्याविषयी त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यात तो म्हणतो, उणे 9 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये  काम करणे खरचं अवघड काम आहे. मात्र मेहनत तुम्हाला नेहमी पुढे घेऊन जात असते. त्यामुळे मला त्या गाण्याचे चित्रिकरण करण्यास प्राधान्य द्यायचे होते. आम्ही सगळ्यांनी काश्मिरमध्ये चित्रिकरण पूर्ण केले. ते गाणे टी सीरिजच्यावतीनं प्रदर्शित होणार आहे.

सध्या सोशल मीडियावर रंधावा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यात रंधावाच्या नाकातून रक्त येत असल्याचे दिसत आहे. ते पाहून त्याला किती जीवघेण्या थंडीला सामोरं जावं लागले हे दिसून येते. गुरुच्या फॅन्सनंही त्याच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट केल्या आहेत. त्यातून त्याला चाहत्यांनी काय झाले असा प्रश्न विचारला आहे. रंधावाचे नवे गाणे मेंहदी वाले हाथ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. त्यात त्याच्या जोडीला संजना सांघी दिसून येत आहे. हे गाणे युट्युबवर लोकप्रिय झाले आहे. त्या गाण्याला दोन आठवड्यात 47 मिलियनपेक्षाही जास्त व्ह्युज मिळाले आहेत.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com