बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर OTT वर रिलीज होणार 'पुष्पा' l Allu Arjun | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun,Rashmika Mandanna

बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर OTT वर रिलीज होणार 'पुष्पा'

बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमीच पसंदी मिळत असते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun)अॅक्शन थ्रिलर 'पुष्पा: द राइज - पार्ट 1'(Pushpa : The Rise) बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केल्यानंतर चाहत्यांना आता OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) देखील आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच फहद फासिलने (Fahad Fasil)तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. हा चित्रपट ७ जानेवारीला प्राइम व्हिडिओवर (Prime video)प्रदर्शित होणार आहे. तमिळ, मल्याळम आणि कन्नड (Tamil, Malayalam,Kannada) या तीन भाषेतही हा चित्रपट चाहत्यांना पाहता येणार आहे.

या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना अल्लू अर्जुन म्हणाला,"जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हाच ती मला आवडली. त्या व्यक्तीचा प्रवास ज्या पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला आहे, त्यात अनेक बारकावे जोडले गेले आहेत. माझ्या चित्रपटाच्या कारकिर्दीत मी अशी भूमिका कधीच केलेली नाही. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर रिलीज झाल्यामुळे जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल याचा मला आनंद वाटतो.

पुष्पा चित्रपटाची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना म्हणाली, 'अनेक महिन्यांच्या मेहनतीचे आणि प्रशिक्षणाचे फळ मिळाले. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांसारख्या अभिनेत्यांसोबत काम करणे माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.

तेलुगु चित्रपटसृष्टीतील त्याचा पहिला चित्रपट फहद फासिल म्हणाला, 'पुष्पा माझ्यासाठी तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी महत्वाची भूमिका ठरली. माझ्या व्यक्तिरेखेला ज्या प्रकारे या चित्रपटात आकार दिला गेला आहे त्याच पध्दतीने कथेतील प्रत्येक पात्राचा खोलवर अभ्यास केला गेला आहे. मला अशा विशेष भूमिकेसाठी तयारी करायला आवडते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top