'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; फक्त 4 दिवसात जमवला 'इतका' गल्ला I Pushpa | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pushpa : The Rise

बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते.

Pushpa Box Office : 'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

Pushpa Box Office : बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. दाक्षिणात्य चित्रपटातील अॅक्शन सिन्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर देखील धमाका केलाय. विशेषतः हिंदीत हा चित्रपट पहिल्यांदाच प्रदर्शित झालाय.

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या जोडीनं बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. जेव्हा सुरुवातीच्या वीकेंडनंतर कामकाजाचा आठवडा सुरू होतो, तेव्हा चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये लक्षणीय घट होते. पण, पुष्पा चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं पहिल्या सोमवारी 4.25 कोटींचा गल्ला जमवला. पुष्पा हा एक तेलुगु चित्रपट असून तो हिंदीतही प्रदर्शित झालाय. हिंदी प्रेक्षकांमध्येही चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय.

अल्लूच्या पुष्पा- द राइज चित्रपटानं स्पायडरमँन नो वे होम, सूर्यवंशी, मास्टर आणि वकील साब चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागं टाकलंय. गेल्या शुक्रवारी अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट देशभरात तीन भाषांमध्ये 1400 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, तर केवळ तीन दिवसात 173 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं 3.11 कोटींची ओपनिंग घेतली, तर शनिवारी 3.55 कोटी आणि रविवारी 5.18 कोटींची कमाई केलीय. पहिल्या सोमवारचे निव्वळ संकलन शनिवारपेक्षा जास्त आहे. पुष्पाच्या हिंदी व्हर्जनचं चार दिवसांचं निव्वळ कलेक्शन आता 16.09 कोटी झालंय. सत्यमेव जयते 2, बंटी और बबली 2, मुंबई सागा यांसारख्या चित्रपटांपेक्षा पु'पुष्पा: द राइज' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.