
PV Sindhu कुणाला म्हणाली 'आय लव्ह यू' ?
भारताची बॅडमिंटन चॅम्पियन पीव्ही सिंधू ही नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मिडियाच्या पोस्टवरुनसुद्धा सुद्धा नेहमीच चर्चेत असते. तीच नाहीतर क्रीडाक्षेत्रातील अनेक खेळाडू कायम चर्चेत असतात. या खेळाडूंचे चाहते त्यांच्या पोस्ट आपापल्या सोशल मिडियावर शेअर करत असतात. पीव्ही सिंधूने असाच एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच शेअर केलाय.
पीव्ही सिंधू आपल्या सोशल मिडियावर नेहमीच व्हिडिओ पोस्ट करत असते परंतु या व्हिडिओमध्ये पीव्ही सिंधू 'आय लव्ह यू' असं म्हणाली आहे. हे वाक्य ती कोणाला उद्देशून म्हणाली हे अजूनतरी स्पष्ट नाहीये.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पीव्ही सिंधूनं नुकतीच वर्षातील पहिली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी सिंधूनं 2017 मध्ये सय्यद मोदी बॅडमिंटन चॅम्पियशिप स्पर्धा जिंकली होती. ती सोशल मिडियातसुद्धा चर्चेत असते. तीने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तीच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही ईथे पाहू शकता.
या पोस्टमधील व्हिडिओमध्ये ती एका आरश्यासमोर उभी राहून स्वता: आपला एक व्हिडिओ शूट करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती स्वता:वर प्रेम करा असं सांगत आहे. तुम्ही जगातील सगळ्या गोष्टींसाठी पात्र आहात. स्वता:वर विश्वास ठेवा. मोठे स्वप्न बघा, तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. असं ती या व्हिडिओत म्हणाली आहे. त्याचबरोबर ती व्हिडिओच्या शेवटी 'आय लव्ह यू' असंसुद्धा म्हणाली आहे, पण हे वाक्य कुणाला उद्देशून म्हणाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Web Title: Pv Sindu Instagram Video I Love You
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..