R Madhavan Birthday: यावर्षी वाढदिवसाला माधवन करणार 'ही' आवडती गोष्ट.. म्हणाला..

आर माधवन त्याच्या सिनेमांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या 'रॉकेट्री- द नांबी इफेक्ट' सिनेमानं तर जागितक स्तरावर सम्मान मिळवला होता.
R Madhavan Birthday
R Madhavan BirthdayEsakal

R Madhavan Birthday: अभिनेता दिग्दर्शक आर. माधवन सध्या त्याचा कामात व्यस्त आहे आणि यंदाचा वाढदिवस कसा करणार आहे हे जाणून घेऊ या ! काम आणि वाढदिवस यांचा समतोल साधून तो यंदा वर्किंग बर्थडे साजरा करणार असल्याचं समजतंय. तो सध्या नयनतारा आणि सिद्धार्थसोबत त्याच्या पुढील प्रोजेक्टचं चेन्नईमध्ये शूटिंग करत आहे.(R Madhavan Birthday Special inside story)

R Madhavan Birthday
Akash & Shloka Blessed Baby Girl: अंबानींच्या घरी 'लक्ष्मी' आली..आकाश आणि श्लोका अंबानी यांना कन्यारत्नाचा लाभ..
R Madhavan Birthday
Kajol: ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये काजोलवर खिळल्या नजरा..

वर्किंग वाढदिवस साजरा करण्यासंदर्भात आर माधवन म्हणाला ,"वाढदिवस खास आहे, यात काही शंका नाही, पण माझ्यासाठी माझे काम तितकेच महत्त्वाचे आहे. मला जे आवडत ते करत हा वाढदिवस मी साजरा करणार आहे आणि म्हणून मी स्वतः ला भाग्यवान समजतो आणि हेच माझ्यासाठी बेस्ट गिफ्ट आहे''.

R Madhavan Birthday
Katrina-Vicky First Meet Video Viral: समोर आला कतरिना-विकीचा पहिल्या भेटीचा व्हिडीओ..पाहताच अभिनेत्रीला म्हणाला होता..

विशेष म्हणजे आयफा पुरस्कारांमध्ये आर माधवनच्या उल्लेखनीय कामगिरी साठी त्याला 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' या चित्रपटातील उत्कृष्ट कामासाठी प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

माधवनने या चित्रपटात नंबी नारायणची भूमिका साकारली होती. माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची उल्लेखनीय कथा दाखवणाऱ्या चरित्रात्मक चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. नुकत्याच झालेल्या कौतुकाने आर माधवन भारावला अन् त्यानं पुन्हा जोमानं कामाला सुरुवात केली आहे.

R Madhavan Birthday
Viral Video: 'बलम पिचकारी'वर माधुरी अन् करिश्माचा भन्नाट डान्स.. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आठवले '90s' चे दिवस

आर माधवनच्या 'TEST' नावाच्या आगामी प्रोजेक्ट ने चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत चर्चा ना उधाण आलं आहे. मोठ्या पडद्यावर विविध भूमिकांमध्ये स्वतःला झोकून देण्याची त्याची शैली नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com