
R. Madhavan घरी पोंगलचं जंगी सेलिब्रेशन, फोटो व्हायरल
पोंगल या सणाला दक्षिण भारतातखुप महत्त्व आहे. दरम्यान, दाक्षिणात्य कलाकार पोंगल मोठ्या उत्साहात पोंगल साजरा करताना दिसत आहेत. दरम्यान, सर्वांच्या मनावर आपल्या स्मित हास्याने जादू करणारा अभिनेता आर माधवन सध्या चर्चेत आला आहे. (R. Madhavan celebrate pongal photo viral )
आर माधवनने नुकतंच त्यांच्या घरातील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये, तो आणि त्याचे कुटुंब मोठ्या उत्साहात पोंगल साजरा करताना दिसत आहे. सणानिमित्त माधवनच्या घरी उडीद वडे केल्याचे पाहायाला मिळत आहे.
पोंगल हा दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा एक महोत्सव आहे. ‘तमिळर् तिरुनाळ्’ म्हणजेच तमिळ भाषिकांचा शुभदिवस मानला जाणारा हा सण जगात जिथे म्हणून तमिळ भाषिक लोक आहेत.
हेही वाचा: Selfiee: अक्षय कुमार आणि इमरानी हाश्मीच्या 'सेल्फी'चे मोशन पोस्टर रिलीज
तिथे, उदा. भारतात प्रामुख्याने तमिळनाडू राज्यात आणि भारताबाहेर श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, युरोपीय देश, उत्तर अमेरिका, दक्षिण आफ्रिका, मॉरिशस इत्यादी अशा सर्व देशांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
हेही वाचा: Bigg Boss 16: शिव ला पुन्हा धक्का! साजिद घराबाहेर...घरातले नाराज मात्र नेटकरी जोमात
पोंगल सणाचं महत्त्व
तमिळ संस्कृतीमध्ये सूर्याला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग तीन दिवस पोंगल हा सण येतो. मकर संक्रमणाची ही घटना सहसा प्रतिवर्षी 14 ते 16 जानेवारीच्या मध्ये पुनरावृत्त होते. या दिवशी पोंगल सणाच्या निमित्ताने सारे शेतकरी आणि कष्टकरी वर्गातील लोक सूर्याचे धन्यवाद मानतात. जाते.
शेतकामामध्ये उपयोगी असलेल्या सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते. नववर्षाचे स्वागत म्हणून सूर्यपूजा केली जाते. या काळात शिवपूजा आणि रुद्राभिषेकही केला जातो. भोगी पोंगल या दिवशी इंद्रपूजा आणि आप्त लोकांसह गोड भोजन केले जाते. दुसऱ्या दिवशी घराच्या अंगणात तांदळाची खीर शिजविली जाते आणि तिचा नैवेद्य सूर्याला दाखविला जातो. तिसऱ्या दिवशी गोपूजन केले