पुलाखालून आता बरच पाणी गेलंय, आर माधवनने दिला 'या' चित्रपटाला नकार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


R Madhavan doesn’t want to be Manu in Tanu Weds Manu anymore

पुलाखालून आता बरच पाणी गेलंय, आर माधवनने दिला 'या' चित्रपटाला नकार..

R Madhavan : आर माधवन आणि कंगना रणौत यांचे दमदार अभिनय आणि अत्यंत रोमँटीक अशी लव्हस्टोरी आपण 2011 मध्ये आलेल्या 'तन्नू वेड्स मन्नू' या चित्रपटात आपण अनुभवली. हा चित्रपट इतका हीट झाला की चाहते आजही तो चित्रपट विसरलेले नाही. त्याच चाहत्यांच्या प्रतिसादावर 'तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स' हा दुसरं भागही प्रदर्शित करण्यात आला. तोही चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगलाच गाजला. आर माधावन आणि कंगनाची केमिस्ट्री लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. या चित्रपटाचा तिसरा भागही येणार असल्याची चर्चा होती. पण अखेर त्याला पूर्णविराम मिळाला आहे. 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने याबाबत भाष्य केले. (R Madhavan doesn’t want to be Manu in Tanu Weds Manu anymore)

या मुलाखतीत त्याला विचारण्यात आले की 'तन्नू वेड्स मन्नू'चा तिसरा भाग येणार आहे , त्यात तूच 'मन्नू' हे पात्र सकरणार आहेस का. त्यावर त्याने साफ नकार दिला. तो म्हणाला, 'मला वाटतं आता पुलाखालून बरच पाणी गेलंय. कारण मेलेल्या घोड्याचा लगाम ओढण्यात काहीही अर्थ नसतो. चित्रपट विश्वात नवी कथा, नवा आशय घेऊन येणे हे खूप कठीण काम आहे. कारण आपल्याकडे तसा आशयही हवा. उद्या 'अ‍ॅव्हेंजर्स' किंवा 'सुपरहिरो' यासारख्या चित्रपटाचे असे भाग येणे सोपे आहे कारण त्यांच्याकडे त्यासाठी लागणारा उत्तम आशय आहे. 'तन्नू वेड्स मन्नू'च्या बाबतीत हे होऊ शकत नाही. मला जेवढ करायचं होतं ते मी केलं आता मला आता 'मन्नू' म्हणून परत यायची इच्छा नाही,' असे तो म्हणाला.

2011 मध्ये रिलीज झालेल्या 'तन्नू वेड्स मन्नू' या चित्रपटात दोन अनोळखी माणसं एकमेकांना कशी भेटतात, कशी प्रेमात पडतात आणि मग त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास त्यात दाखवण्यात आला होता. तर 2015 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात लग्नानंतर त्यांचे आयुष्य कसे बदलते यावर भाष्य करण्यात आले आहे.

Web Title: R Madhavan Doesnt Want To Be Manu In Tanu Weds Manu Anymore

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bollywood Newsr madhavan