"त्या भीतीमुळे पोस्ट केला शर्टलेस फोटो"; अखेर माधवनने सांगितलं कारण | R Madhavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

R Madhavan

"त्या भीतीमुळे पोस्ट केला शर्टलेस फोटो"; अखेर माधवनने सांगितलं कारण

वयाची पन्नाशी ओलांडलेला अभिनेता आर. माधवन R Madhavan आजही असंख्य तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जादूनं माधवनने प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घातली. सोशल मीडियावर सक्रिय असलेला माधवन अनेकदा स्वत:चे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतो. असंच एकेदिवशी त्याने शर्टलेस सेल्फी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता. माधवनने हा सेल्फी पोस्ट करताच त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. त्याची सहकलाकार दिया मिर्झासुद्धा कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नव्हती. त्या शर्टलेस फोटोवर पत्नीची काय प्रतिक्रिया होती, याबद्दल त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

'रहना है तेरे दिल में' या चित्रपटात भूमिका साकारल्यापासून चाहत्यांमध्ये माधवनची प्रतिमा रोमँटिक हिरो म्हणून बनली आहे. 'द टेलिग्राफ ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "खरंतर मला तो फोटो इतका खास वाटत नाही. मी हॉट दिसणारा अभिनेता नाही. हेच तुम्ही हृतिकबद्दल बोलला असता तर मी समजू शकलो असतो. तो तर ग्रीक गॉडच आहे. त्याला पाहून मीसुद्धा थक्क होतो. त्याच्यासमोर मी तुम्हाला हॉट अभिनेता कसा वाटू शकतो? माझ्या पत्नीने तर मला सक्त ताकिदच दिली होती. तू किमान तुझ्या वयाचा विचार तरी कर आणि असे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू नकोस, असं ती मला म्हणाली."

हेही वाचा: "माझे सर्व प्लॅन्स उद्ध्वस्त झाले"; घटस्फोटावर समंथाची प्रतिक्रिया

माधवनने तो शर्टलेस फोटो सोशल मीडियावर का पोस्ट केला याविषयी विचारलं असता तो पुढे म्हणाला, "आता खरंतर मलाही माहित नाही की मी तो फोटो का पोस्ट केला. कधीकधी मला स्वत:लाच प्रश्न पडतो. माझे चाहते अजूनही आहेत का, हे कदाचित मला तपासायचं होतं. लोक मला विसरणार तर नाहीत ना, ही एक भीती प्रत्येक कलाकाराच्या मनात असते."

Web Title: R Madhavans Reaction On Why He Posted His Shirtless Pic That Went Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainmentr madhavan