आर. माधवनच्या मुलाने महाराष्ट्रासाठी जिंकलं पदक | Vedaant Madhavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vedaant madhavan

आर. माधवनच्या मुलाने महाराष्ट्रासाठी जिंकलं पदक

अभिनेता आर. माधवनचा R Madhavan मुलगा वेदांतने Vedaant पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नुकतंच बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या ४७व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने सातवं पदक जिंकलं आहे. वेदांतने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ४ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकले आहेत. त्याच्या या यशावर नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटातील माधवनची सहकलाकार अभिनेत्री दिया मिर्झानेही वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत. स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं.

ऑगस्ट महिन्यात वेदांतचा १६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मुलाच्या वाढदिवसानिमित्त माधवनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली होती. 'ज्या ज्या बाबींमध्ये मी उत्कृष्ट आहे, त्या सर्वांमध्ये माझ्या पुढे जाण्यासाठी धन्यवाद. तुझ्यामुळे माझा उर अभिमानाने भरून येतो. तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळतंय. मी खूप नशिबवान पिता आहे', असं त्याने लिहिलं होतं. वेदांत सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत असून 'आदर्श मुलगा' म्हणून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा: आर्यनच्या सुटकेनंतर भन्नाट मीम्सचा पाऊस; तुम्हालाही अनावर होईल हसू!

आर. माधवनने हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 'थ्री इडियट्स', 'रंग दे बसंती', '१३ बी', 'तनू वेड्स मनू', 'गुरू', 'रहना है तेरे दिल मे', 'झिरो' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत. माधवन लवकरच 'रॉकेटरी : द नंबी इफेक्ट' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: R Madhavans Son Vedaant Winning 7 Medals In Swimming Championships Netizens Are Calling Him An Ideal Son

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top