Radhika Apte: "तेलुगू इंडस्ट्री पुरुषप्रधान आहे...', राधिका आपटेनं टॉलिवूडवर साधला निशाण,'तो' व्हिडीओ पाहिल्यानंतर भडकले नेटकरी

Radhika Apte: राधिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी तिच्यावर भडकले आहेत.
Radhika Apte
Radhika Apte

Radhika Apte: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. राधिका ही विविध विषयांवरील तिची मतं मांडत असते. अशताच आता राधिकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राधिका ही तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलताना दिसत आहे. राधिकाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकरी तिच्यावर भडकले आहेत.

काय म्हणाली राधिका?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, राधिका ही तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना म्हणते, "तेलुगू इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे जिथे मी सर्वात जास्त संघर्ष केला आहे.कारण ती इंडस्ट्री अतिशय पितृसत्ताक आहे. एक प्रकारे ती चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान आहे. तिथे महिलांना ज्या पद्धतीने वागवले जाते ते असह्य आहे."

पुढे ती म्हणते,"चित्रपटांतील महिलेची भूमिका ही 'पती हा माणूस देवासारखा आहे', असं म्हणणारी असते. सेटवर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीप्रमाणे वागवले जाते. तो अभिनेता कलाकारांना काही विचारत नाही.अभिनेता सध्या चांगला मूडमध्ये नाहीये आणि त्याला चहा प्यायचा आहे, असे सेटवर सांगण्यात येते. यामध्ये मी सतत संघर्ष केला आहे आणि आता मी ते सोडून दिले आहे.मला असे वाटते की, हे फक्त माझ्यासोबतच घडत आहे." राधिकाचा हा जुना व्हिडीओ आहे, असं म्हटलं जात आहे.

पाहा व्हिडीओ:

Radhika Apte
Radhika Apte: "गेले २ तास आम्हाला...", एअरपोर्टवर राधिकाला कुणी डांबून ठेवलंय? अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

नेटकरी भडकले

राधिकाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. "मी तिच्या मताचा आदर करतो, परंतु एका व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवावर आणि घटनेवर आधारित संपूर्ण उद्योगाला असे लेबल लावणे अयोग्य आहे." अशी कमेंट एका नेटकऱ्यानं केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com