
शुटींगचा पहिला दिवस, घ्यावी लागली गर्भनिरोधक गोळी; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा
अभिनेत्री राधिका मदनने (Radhika Madan) अलीकडेच खुलासा केला की, प्रत्येकाला असे वाटते की मी ज्या पहिल्या चित्रपटासाठी शूटिंग केले तो 'पटाखा' (Patakha) होता, प्रत्यक्षात तो 'मर्द को दर्द नहीं होता' (Mard Ko Dard Nahi Hota) होता. मी साजिद अलीच्या (Sajid Ali) लैला मजनूच्या (Laila Majnu) ऑडिशनला गेले होते, तिथे कोणीतरी मला विचारले, "अॅक्शन आता है?" तेव्हा मी त्यांना सांगितले की मी व्यावसायिक नृत्य केले आहे, तेव्हा त्यांनी मला एका खोलीत नेले आणि मला काही किक करायला लावल्या. साजिद सरांना भेटण्यापूर्वी मी वासन सरांना भेटलो आणि त्यांनी मला साइन केले.
मला अॅक्शनमध्ये शून्य स्वारस्य असल्याने, मी दररोज या शैलीतील चित्रपट पाहून माझी तयारी सुरू केली. मी दर 10-15 मिनिटांनी ब्रेक घेतला, पण किमान एक महिन्यासाठी दिवसातून दोन चित्रपट पाहण्यास स्वत:ला भाग पाडले. त्यानंतर, माझे मार्शल आर्टसचे प्रशिक्षण सुरू झाले, जे 10 महिने दररोज चार-पाच तास चालले. त्यानंतर मी या प्रोसेसच्या प्रेमात पडले.

Radhika Madan
माझ्या प्रशिक्षणातून मला मार्शल आर्टिस्टबद्दल खूप काही शिकायला मिळाले; मला त्यांच्याप्रमाणे शिस्तबद्ध बनवण्यासाठी माझा प्रशिक्षक मला त्यांच्या जीवनशैलीबद्दल सांगाययचा. कधी कधी, अभिमन्यू दासानी (Abhimanyu Dasani), माझा सहकलाकार आणि मी एकत्र प्रशिक्षण घ्यायचो. तो भाग्यश्री (Bhagyashree) मॅडमचा मुलगा आहे हे मला माहीत नव्हते, जोपर्यंत मी वाचन सेशनसाठी त्यांच्या घरी गेले होते. माझी कार असताना तो ऑटोरिक्षातून प्रवास करायचा. मला वाईट वाटायचे आणि मी त्याला मग राईड ऑफर करायचे. मी त्याला कधी-कधी चेष्टेत मारलेही, पण तो नेहमीच गोड होता.
सेटवर माझा पहिला दिवस अनपेक्षित होता. मला टीव्हीची सवय झाली होती. पण चित्रपटाच्या सेटवर खूप शांतता असायची. मी प्रोडक्शन टीमला विचारलं की आम्ही त्या दिवशी शूटिंग करत होतो की नाही, तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तयार असेन तेव्हा मला बोलावले जाईल. टीव्हीवर लोक मला १५ मिनिटांत तयार व्हा, अशी मागणी करायचे त्यामुळे मी घाबरले होते. मला दिवसाला सात-आठ सीन करायची सवय होती. येथे, फक्त एक शॉटचा शेड्यूल होता.
हेही वाचा: भूषण कुमारच्या T-seriesचा OTT स्पेसमध्ये प्रवेश

Radhika Madan
माझ्या पहिल्या शॉटसाठी, मला गर्भनिरोधक गोळी (Contraceptive pills) विकत घ्यावी लागली. हे मजेदार होते कारण माझे पालक मला सरप्राईज करण्यासाठी दिल्लीहून आले होते. जेव्हा लोकांनी त्यांना शूटबद्दल विचारले तेव्हा ते काय सांगतील या विचाराने माझे वडील अस्वस्थ झाले. जेव्हा मी माझा पहिला शॉट पूर्ण केला तेव्हा आजूबाजूला पाने आणि फुले पडण्याची आणि लोक टाळ्या वाजवताना मी कल्पना केली होती, परंतु ते तसे नव्हते. अवघ्या दोन-तीन मिनीटांत ते संपले. त्यानंतर, माझ्या पालकांनी मला या आनंदात डिनरसाठी बाहेर नेले जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
या चित्रपटने माझा इंडस्ट्रीबद्दलचा दृष्टीकोन बदलला आणि त्याचे श्रेय वासन सर (Vasan) आणि विशाल (Vishal Bharadwaj) यांना जाते. मी 'मर्द को दर्द नहीं होता' च्या पहिल्या शेड्युल नंतर लगेचच पटाखा साठी ऑडिशन दिले होते आणि दुसऱ्या शेड्यूल नंतर मी गोव्यात असताना मला फोन आला की विशाल सरांना मला दुसऱ्या दिवशी भेटायचे आहे. त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली, मी एअरपोर्टवर रिहर्सल केली आणि थेट त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. ऑडिशननंतर त्यांनी मला दोन गोष्टी विचारल्या- मी लठ्ठ आणि टॅन होण्यास तयार आहे का? मी हो म्हणाले'.
Web Title: Radhika Madan Speaks About Taking A Contraceptive Pill On The Very First Day Of Shooting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..