अखेर राधिका सौमित्रला लग्नासाठी देते होकार पण...

वृत्तसंस्था
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सौमित्रचं राधिकावर प्रेम आहे. तो तिची काळजी घेतोय. सगळ्यांना म्हणजे अगदी गुरूच्या आई-वडिलांना वाटतं की सौमित्र आणि राधिकानं लग्न करावं. सुरुवातीला राधिका याला तयार नसतेच. पण आता मालिकेत मोठं वळण येणार. ते म्हणजे राधिका सौमित्रला लग्नासाठी होकार देते.

मुंबई: झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सध्या एका नव्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिका सुरू होऊन बरीच वर्ष झाली. या मालिकेनंतर सुरू झालेल्या मालिका सुरू झाल्या आणि संपल्या. तरीही ही मालिका अजून टीआरपी रेटिंगमध्ये नंबर 1 किंवा नंबर 2 वर असते. आता या मालिकेत आता आणखीन एक मोठा टर्न येणार आहे.

सौमित्रचं राधिकावर प्रेम आहे. तो तिची काळजी घेतोय. सगळ्यांना म्हणजे अगदी गुरूच्या आई-वडिलांना वाटतं की सौमित्र आणि राधिकानं लग्न करावं. सुरुवातीला राधिका याला तयार नसतेच. पण आता मालिकेत मोठं वळण येणार. ते म्हणजे राधिका सौमित्रला लग्नासाठी होकार देते.

लग्नाची वेळही ठरते. पण हे लग्न थांबण्याची शक्यता वाढत आहे ती म्हणजे राधिकाचा पहिला नवरा गुरूमुळे. सध्या गुरू एकटाच राहत असून शनाया पोपटरावाबरोबर आहे. राधिकाने सौमित्रशी लग्न करू नये अशी गुरूची इच्छा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhika ready to marry saumitra but guru stop marriage in Mazya mavryachi bayko