'रईस'चा ट्रेलर अखेर रिलीज

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई - किंग खानचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'रईस'चा ट्रेलर अखेर आज (बुधवार) रिलीज झाला. 

शाहरुख खान या चित्रपटात 'रईस खान' या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘रईस’ची कथा 1980 च्या दशकातील 'गुजरात'वर आधारित असून 'रईस खान' या दारू तस्कराच्या अवतीभोवती फिरणारी आहे. या चित्रपटात शाहरुख बरोबरच नवाजुद्दीन सिद्दकी आणि मराठमोळा अभिनेता अतुल कुलकर्णी यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. तर, पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.  

माहिरा खान चित्रपटात असल्याने चित्रपट येण्याआधीच वादात अडकला होता. परंतु, शाहरुखच्या चाहत्यांमध्ये मात्र चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता आहे. 

राहुल ढोलकियाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून 25 जानेवारी 2017 रोजी हा चित्रपट येणार आहे
 
विडिओ सौजन्य - Red Chillies Entertainment youtube

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raees trailer release

व्हिडीओ गॅलरी