Rahat Fateh Ali Khan Reacts : 'मी त्याची माफी मागितली आणि तो...'! प्रसिद्ध गायक राहत फतेह अली खान यांचे 'त्या' व्हिडिओवर स्पष्टीकरण

राहत फतेह अली खान यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली होती.
Rahat Fateh Ali Khan Reacts
Rahat Fateh Ali Khan Reacts esakal

Rahat Fateh Ali Khan reacts to backlash over viral video : प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्यांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली होती. त्या विद्यार्थ्याकडून बाटली हरवल्याचा आरोप गायकानं केला होता. त्यावर त्यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी त्याला मारहाण केली.

राहत फतेह अली खान यांचा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर नेटकऱ्यांनी प्रचंड टीका केली होती. एवढ्या प्रसिद्घ गायकाकडून अशा प्रकारच्या वागण्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी जे काही केले ते अतिशय अमानुष होते अशाही प्रतिक्रिया यानिमित्तानं समोर आल्या होत्या. अखेर त्यावर आता राहत फतेह अली खान यांची प्रतिक्रिया चर्चेत आहे.

राहत फतेह अली खान यांनी नाविद हुसेन नावाच्या विद्यार्थ्याला ती मारहाण केली होती. एका पॉडकास्टमधून समोर आलेल्या त्या बातमीनं अनेकांना मोठा धक्का बसला होता. राहत यांनी म्हटले आहे की, मी नाविदची माफी मागितली आहे. हिंदूस्थान टाईम्सनं याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. मी जेव्हा त्याची माफी मागितली तेव्हा तो रडायला लागला. यापूर्वी राहत फतेह अली खान यांना संबंधित विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीवरुन खूप ट्रोल करण्यात आले होते.

राहत यांनी त्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, मी त्याची माफी मागितली. तेव्हा तो रडू लागला. मला तो म्हणाला उस्तादजी तुम्ही असे का केले, त्यावर मी त्याला म्हणालो, मी वडिलांच्या भूमिकेत होतो. तू शागीर्द आहेस तेव्हा तू देखील त्याप्रमाणे वागण्याची गरज आहे. मी शिक्षकाच्या भूमिकेत होतो. त्यानुसार वागलो आहे.

Rahat Fateh Ali Khan Reacts
Rahat Fateh Ali Khan: राहत फतेह अली खान यांनी केली नोकराला मारहाण, धक्कादायक व्हिडीओ समोर

त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राहत फतेह अली खान हे सातत्यानं त्या विद्यार्थ्याला मारहाण करत होते. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरुन गायकावर प्रचंड टीका करण्यात आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com