अभिनेता राहुल भट झळकणार चिनी चित्रपटात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई : "हीना' मालिकेमध्ये समीरची भूमिका साकारून घरोघरी पोहोचलेला अभिनेता राहुल भट आता एका "ट्रू हिरोज्‌' या चिनी चित्रपटामध्ये काम करीत आहे. हा चिनी चित्रपट मेन स्ट्रीममधील असून राहुलने त्यात मुख्य भूमिका साकारली आहे. एका चिनी चित्रपटात भारतीय कलाकाराने मुख्य भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा चित्रपट या वर्षअखेरीस प्रदर्शित होणार आहे. 

मुंबई : "हीना' मालिकेमध्ये समीरची भूमिका साकारून घरोघरी पोहोचलेला अभिनेता राहुल भट आता एका "ट्रू हिरोज्‌' या चिनी चित्रपटामध्ये काम करीत आहे. हा चिनी चित्रपट मेन स्ट्रीममधील असून राहुलने त्यात मुख्य भूमिका साकारली आहे. एका चिनी चित्रपटात भारतीय कलाकाराने मुख्य भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ आहे. हा चित्रपट या वर्षअखेरीस प्रदर्शित होणार आहे. 

राहुल भट हा मूळचा काश्‍मीरचा. मॉडेलिंग करीत असतानाच त्याला टीव्ही शोज्‌ आणि चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. "अगली', "नयी पडोसन', "ये मोहब्बत है' अशा काही हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. छोट्या पडद्यासाठी काही मालिकांची त्याने निर्मितीही केली आहे. आता त्याचा "दासदेव' हा चित्रपट येत आहे. "इस रात की सुबह नही', "धारावी', "चमेली", "हजारो ख्वाहिशे ऐसी' अशा काही चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी "दासदेव'चे दिग्दर्शन केले आहे. राहुल या चित्रपटात देव ही भूमिका साकारीत आहे. याबद्दल तो म्हणाला, "की कोणताही चित्रपट स्वीकारताना त्या चित्रपटाचा दिग्दर्शक कोण आहे ते पहिल्यांदा मी पाहतो आणि नंतरच तो चित्रपट स्वीकारतो. "दासदेव'चे दिग्दर्शक सुधीर मिश्रा आणि ही देवची भूमिका मला आवडली. देव हा एका पॉलिटिशन्सचा मुलगा असतो. सुरुवातीला तो आपल्याच तोऱ्यात वावरत असतो आणि त्याची चूक जेव्हा त्याला कळते तेव्हा तो दासचा देव बनतो. 

राहुलच्या "ट्रु हिरोज्‌' या चिनी चित्रपटाचे चित्रीकरण बीजिंग, शांघाय वगैरे ठिकाणी झालेले आहे. "कान' चित्रपट महोत्सवात त्याचा "अगली' चित्रपट गेला होता. तेथे एका समीक्षकाने हा चित्रपट पाहिला आणि त्याबद्दल तसेच राहुलबद्दल त्याने भरभरून लिहिले. ते वाचल्यानंतरच राहुलला या चायनीज चित्रपटाची ऑफर्स आली. राहुल म्हणाला, की या चित्रपटामध्ये मी एका भारतीय तरुणाची भूमिका साकारीत आहे. हा भारतीय तरुण चीनमध्ये जातो. त्याच्याकडे एक चीप्स असते आणि ती त्याला तेथील एका माफियाला द्यायची असते व पैसे घ्यायचे असतात. मात्र तो माफिया ती चीप्स घेतो आणि पैसैही देत नाही. त्यानंतर तो कसा बदला घेतो असे साधारण कथानक आहे. तेथील चित्रीकरणाची सिस्टिम्स खूप चांगली आहे. आपल्यापेक्षा तेथे अधिक मेहनत घेत असतात. मी या चित्रपटात माझे संवाद स्वतः म्हटलेले आहेत. मैंडरिन भाषेत ते आहेत. आम्ही एक दुभाषी ठेवलेला होता. त्याच्यामार्फंत संवाद म्हटलेले आहेत. लवकरच या चित्रपटाच्या प्रमोशन्सकरिता मी चीनला जाणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul bhatt introduce in Chinese movie