दोन केळींचे बिल पाहून चक्रावला राहुल बोस

टीम ईसकाळ
बुधवार, 24 जुलै 2019

राहुलने स्वतःसाठी दोन केळी ऑर्डर केली. वेटर केळी घेऊन आला आणि बिलंही घेऊन आला. या दोन केळींचे बिल बघून राहुल चाट पडला. 

5 स्टार हॉटेलमध्ये खाण्या-पिण्या-राहण्याची चंगळ असली, तरी तेथील बिलही आवाच्या सवा असते. याचाच प्रत्यय अभिनेता राहुल बोसला आलाय. राहुल सध्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे. पण इथलं खाणं त्याला चांगलंच महागात पडलंय. 

राहुलने स्वतःसाठी दोन केळी ऑर्डर केली. वेटर केळी घेऊन आला आणि बिलंही घेऊन आला. या दोन केळींचे बिल बघून राहुल चाट पडला. फक्त दोन केळींचे 442 रूपये बिल आले होते. राहुलने आपल्या ट्विटर अकाऊंटवर याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केलाय. ‘माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल तर हे बघा. फळे तुमच्या आयुष्यासाठी हानीकारक नाहीत, असे कोण म्हणेल? या हॉटेलला विचारा...,’ असे तो या व्हिडिओत म्हणतोय. 

राहुलचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडिओवर अनेक मजेशीर रिप्लाय आलेत. तसेच 5 स्टार हॉटेलमधील मनमानी बिल वसुलीवरही चर्चा होतीये.

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul bose pays 442 rupees for 2 bananas in 5 star hotel