'दिशा खूप चांगली मुलगी आहे. बाकी गोष्टींवर सध्या काही बोलणार नाही’

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 14 November 2020

यंदा बिग बॉसचा 14 वा सीझन जोरदारपणे सुरु आहे. त्यात सहभागी झालेले कलाकार त्यांच्यातील वाद, भांडणे त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी सतत वाढत असतो. शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांच्यातील वाद यामुळे या शो ला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे.

मुंबई - बिग बॉसमधील स्पर्धक प्रसिध्द गायक राहुल वैद्य याने मागील काही दिवसांपूर्वी आपल्या गर्लफ्रेंडच्या नावाचा उल्लेख केला. त्याविषयीची एक पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावर या शो च्या प्रेक्षकांनी त्याचे अभिनंदन करुन त्याला शुभेच्छाही दिल्या होत्या. राहुल सध्या बिग बॉसमध्ये सहभागी झाला आहे. या शो ची लोकप्रियता प्रचंड आहे. त्यात होणा-या वादविवादामुळे हा शो सतत वादाचे कारणही ठरला आहे.

यंदा बिग बॉसचा 14 वा सीझन जोरदारपणे सुरु आहे. त्यात सहभागी झालेले कलाकार त्यांच्यातील वाद, भांडणे त्यामुळे बिग बॉसचा टीआरपी सतत वाढत असतो. शो मध्ये सहभागी होणारे स्पर्धक, त्यांच्यातील वाद यामुळे या शो ला प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. राहुलच्या गर्लफ्रेंडविषयी  कलर्स टीव्हीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर राहुलचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तो त्यावेळी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत झाला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors TV (@colorstv)

इंडियन आयडॉलमध्ये सर्वांच्या पसंतील उतलेला गायक राहुल वैद्य बिग बॉसमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. त्याने बिग बॉसच्या घरात राहून त्याची मैत्रिण दिशा परमारला थेट लग्नाची मागणी घातली आहे, यावेळी तो म्हणाला, आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे.

 

माझ्या आयुष्यात दिशा परमार आहे. पण  ‘तुझ्यावर प्रेम आहे’, हे सांगायला मला इतका वेळ कसा काय लागला. याबद्दल मला माहित नाही, माझ्याशी लग्न करशील का?.आता मी तुझ्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहे. असं म्हणत राहुलने दिशाला प्रपोज केलं होत.

आता राहुलच्या आईनं त्याच्या मैत्रिणीचं कौतूक केलं आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. त्यात त्या म्हणाल्या, मला खरच आनंद झाला आहे. राहुलने अचानक त्याच्या गर्लफ्रेंडला लग्नासाठी विचारले आणि ते पाहून आम्ही सगळे आनंदी झालो. ती खूप चांगली मुलगी आहे. बाकी गोष्टींवर मी सध्या काही बोलू शकत नाही. दिशा परमार ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. ‘प्यार का दर्द है, मीठा मीठा प्यारा प्यारा’,’वो अपनासा’ या भूमिका तिने साकारल्या आहेत.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Vaidya mother reacts to his proposal for Disha Parmar