तान्हाजीचा छोटा रायबा आहे मोठा कलाकार, केले आहेत सुपरहिट सिनेमे

वृत्तसंस्था
Tuesday, 21 January 2020

बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार. झालंही तसंच! या चित्रपटातील तान्हाजीचा मुलगा 'रायबा'ने प्रेक्षकांचे मन जिंकले. जाणून घ्या या छोट्या कलाकाराची मोठी कामगिरी !

मुंबई : तानाजी चित्रपटाला देशभरात एकूण 3880 स्क्रीन्स मिळाल्या आहेत. यात 2D व 3D चित्रपटा दाखविला जात आहे. तर परदेशात या चित्रपटाला 660 स्क्रीन्स देण्यात आले आहेत. तानाजी हा अजय देवगणचा शंभरावा चित्रपट आहे. त्यामुळे त्याच्यासाठी हा चित्रपट अत्यंत जवळचा होता. बहुचर्चित 'तानाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाच्या ट्रेलर्स, टीझरवरूनचे कल्पना आली होती की तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ करणार. झालंही तसंच! या चित्रपटातील तान्हाजीचा मुलगा 'रायबा'ने प्रेक्षकांचे मन जिंकले. जाणून घ्या या छोट्या कलाकाराची मोठी कामगिरी !

आलियाने दुखापतीविषयी केला मोठा खुलासा

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Raiba Malusare # Tanhaji

A post shared by Arush Nand (@arush_nand) on

तान्हाजीमधील प्रत्येक कलाकाराची भूमिका ही लक्षणीय आहे. त्यातूनही रायबाची भूमिका साकारलेल्या मुलानेही उत्तम अभिनय केला आहे. या लहानग्या कलाकाराचे नाव आहे अरुष नंद. अरुष हा खऱ्या अर्थाने 'मुर्ती लहान, किर्ती महान' याचं उत्तम उदाहरण आहे. अरुषने आजवर 150 पेक्षा जास्त जाहिराती, 8 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एवढचं काय त्याने 2 हॉलिवूडच्या सिनेमांसाठीही काम केलं आहे. अरुष फक्त 9 वर्षांचा आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#pediasure #Healty#Drink

A post shared by Arush Nand (@arush_nand) on

मराठी चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून आणि अनेक मालिकांमधून तो दिसला आहे. त्याचं स्वत:चं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे आणि त्यावर त्याने अनेक फोटो शेअर केले आहेत. सलमान, जॉन, अमिताभ बच्चन, धोनी आणि अशा मनोरंजन क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या मंडळींची त्याने भेट घेतली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Happy Birthday Dear @beingsalmankhan Sir, Wish you loads of happiness 

A post shared by Arush Nand (@arush_nand) on

अरुषने अभिनयाचं प्रशिक्षण मुंबईतल्या 'गुंडेजा एज्युकेशन एकॅडमी' मधून घेतलं आहे. फक्त अभिनय नाही तर, अरुषने महत्त्वपूर्ण रोलसाठी डबिंगही केलं आहे. नेटफ्लिक्स ओरिजिनल, रायझिंग स्टार आणि द लायन किंग साठी त्याने डबिंगही केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arush Nand (@arush_nand) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#Emami oil Tvc

A post shared by Arush Nand (@arush_nand) on

अरुषच्या करीअरला सुरुवात झाली ती 2016 मध्ये, सोनम कपूरच्या 'नीरजा' या चित्रपटाने. या चित्रपटासह त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. बॉलिवूडमधील फोबिया, डिअर जिंदगी, ट्युबलाइट, परमानू: द स्टोरी ऑफ पोखरण अशा सुपरहिट सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. वेगवेगळ्या प्रॉडक्टसाठी त्याने जाहिरातीमधून काम केलं आहे. यात काहीच शंका नाही पुढे जाऊन अरुष एक सुपरस्टार होईल. लहान वयातच त्याची कामगिरी कौतुकास्पद आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raiba from Tanhaji movie has done super hit movies