esakal | शिल्पा शेट्टीचा अश्लील चित्रपट प्रकरणात सहभाग?, पोलिसांनी दिले उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

Shilpa Shetty and Raj Kundra

शिल्पा शेट्टीचा अश्लील चित्रपट प्रकरणात सहभाग?, पोलिसांनी दिले उत्तर

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा Shilpa Shetty पती राज कुंद्राला Raj Kundra सोमवारी गुन्हे शाखेने अटक केली. राजला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अश्लील व्हिडीओ शूट करून हॉटशॉट्स या अॅपवर अपलोड केल्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. या संपूर्ण प्रकरणात त्याची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीची अद्याप कोणतीही सक्रिय भूमिका आढळली नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 'पीडितांनी पुढे येऊन क्राइम ब्रांच मुंबईशी संपर्क साधावा. आम्ही योग्य ती कारवाई करू', असं मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) मिलिंद भारंबे म्हणाले. (Raj Kundra case No active role of Shilpa Shetty found yet say cops slv92)

राज कुंद्रा याने पॉर्न चित्रफीत निर्माण करून त्याच्या प्रसारणासाठी 2019 मध्ये आर्म्स प्राईम मीडिया नावाने कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून पॉर्न चित्रफीती प्रसारणासाठी तयार करण्यात आलेले हॉटशॉट्स नावाचे ॲप्लिकेशन लंडनस्थित केनरीन कंपनीला विकले. पण या ॲप्लिकेशनबाबतची बरीच कामे कुंद्रामार्फतच चालू होती. या ॲप्लिकेशन निर्मितीसाठी राज कुंद्राने सुमारे 10 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत. कुंद्रासह मालमत्ता कक्षाने कारवाई करून या अश्लील ॲप्लिकेशनची माहिती तंत्रज्ञान विभागाचा प्रमुख रायन जॉन मायकल थॉर्प यालाही अटक केली आहे. कुंद्रा व थॉर्प दोघांनाही न्यायालायने 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा: "पॉर्न आणि बोल्ड व्हिडीओ यात फरक"; राज कुंद्राच्या अटकेवर गहना वशिष्ठची प्रतिक्रिया

यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठ व मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतला मालमत्ता कक्षाने पॉर्नोग्राफीप्रकरणी अटक केली होती‌. हॉटशॉट्स नावाच्या तयार करण्यात आलेल्या ॲप्लिकेशनवरून कामत व्हिडीओ अपलोड करायचा. गहनाकड़ून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पाहत होता. व्ही ट्रान्स्फरच्या माध्यमातून 2 जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. येथील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करीत होती.

loading image