esakal | पुनम पांडेनं सांगितलं कुंद्राच्या अश्लील उद्योगामागचं 'राज'
sakal

बोलून बातमी शोधा

actress poonam pandey

पुनम पांडेनं सांगितलं कुंद्राच्या अश्लील उद्योगामागचं 'राज'

sakal_logo
By
टीम सकाळ

मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (shilpa shetty) पती राज कुंद्राला (raj kundra) न्यायालयानं 23 जुलैपर्यत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. दरम्यानच्या काळात राजवर अनेकांनी वेगवेगळे आरोप केले आहे. शर्लिन चोप्रा (sherlyn chopra) आणि पुनम पांडे (poonam pandey) यांनी आपले अनुभव सांगितले आहेत. त्या आरोपांमुळे पुन्हा एकदा धक्कादायक खुलासे केले आहेत. राजबरोबर त्याचा मित्र रयान थापरलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासगळ्या परिस्थितीत पुनमनं राजवर मोठा हल्ला केला आहे. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.(raj kundra case poonam pandey disclosure says my number was leaked with obscene messages yst88)

पुनमनं सांगितलं, माझ्या वकिलांनी मला बोलण्यास मनाई केली आहे. तरीही काही गोष्टी सांगण्यासाठी मी व्हिडिओ करत आहे. जर राज माझ्याबरोबर अशा प्रकारे वागु शकतो तर इतरांची काय अवस्था असेल, असा प्रश्न मला पडतो. त्याच्याविषयी काय सांगाव हे मला एक कोडचं आहे. मी त्या मुलींना अशी विनंती करेल की त्यांनी यासगळ्या प्रकारापासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. कारण हे सगळे तुम्हाला वेगळ्या वाटेकडे घेऊन जाणारे आहे. मात्र तुमच्यावर जर अन्याय झाला असेल तर त्याच्याविरोधात तुम्ही आवाज उठवला पाहिजे.

राजनं मला कॉन्ट्रक्ट साईन करण्यास सांगितले होते. मात्र मी त्याला जेव्हा नकार दिला तेव्हा त्यानं मला धमकी दिली. काही करुन मला कॉन्ट्रक्ट साईन करावे लागेल. असे त्यानं सांगितलं. मी सांगेल तसे शुट केलेच पाहिजे. त्यानं माझ्या फोन नंबरवरुन एक मेसेजही लिक केला होता. तो अतिशय अश्लील मेसेज होता. मात्र त्यानंतर मला अनेक ठिकाणांहून फोन यायला सुरुवात झाली होती. मला अतिशय मनस्ताप झाला. तो काळ माझ्यासाठी संघर्षमय होता.

हेही वाचा: 'चुना लावला वाटतं'; मेकअपमुळे श्रुती मराठे ट्रोल

हेही वाचा: City Of Dreams 2 Trailer; बाप जिंकणार की मुलगी?

यापूर्वी पुनम म्हणते, मला शिल्पा शेट्टी आणि तिच्या मुलांसाठी वाईट वाटते आहे. मी कधीच विचार करु शकत नाही. की ती सध्या कोणत्या परिस्थितीतून जात असेल. त्यामुळे मी काही संधीची वाट पाहून माझे गाऱ्हाणे मांडत नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे 2019 मध्ये मी राजच्या विरोधात चोरी आणि फसवणूक केल्याची तक्रार केली होती. मुंबई उच्च न्यायालयात केसही दाखल केली आहे.

loading image