Raj Kundra Case Update: "न्यायालयीन कामकाजास जाणीवपुर्वक उशीर..", राज कुंद्राच्या वकिलांचं स्पष्ट मत

राज कुंद्रा यांच्या वकिलांनी फिर्यादी पक्षावर आरोप केलाय
Raj Kundra Case Update
Raj Kundra Case Update SAKAL

Raj Kundra Case Update News: उद्योगपती आणि अभिनेता राज कुंद्रा याला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पॉर्नोग्राफीची निर्मिती केल्याचा आरोप होता. राज कुंद्रावर IPCच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर राजला या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून या प्रकरणाची संपूर्ण कार्यवाही प्रलंबित आहे. आता या प्रकरणी राज कुंद्राच्या वकिलांचे अधिकृत वक्तव्य समोर आले आहे.

Raj Kundra Case Update
Sonu Sood: "तुझ्या बाबांना काही होणार नाही!" पुन्हा एकदा सोनू सुदने चाहत्याला दिलं मदतीचं आश्वासन

राज कुंद्राच्या वकिलाने एक निवेदन जारी केले आहे की, त्यात लिहीलंय की, "फिर्यादी पक्ष जाणीवपूर्वक या खटल्याला उशीर करत आहे."

राज कुंद्राचे वकील अॅड. प्रशांत पाटील यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, "राज कुंद्रा यांच्याविरुद्धची न्यायालयीन कार्यवाही २०२१ पासून प्रलंबित आहे. आम्ही न्यायालयीन कार्यवाही जलद करण्यासाठी फिर्यादीला सतत विनंती करत आहोत. तथापि, खटल्याच्या नोंदीवरून हे स्पष्ट झाले आहे की, फिर्यादी पक्ष न्यायालयीन कामकाजात जाणीवपूर्वक दिरंगाई करत आहे."

प्रशांत पाटील यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'माझा अशील राज कुंद्रा यांच्या मुलभूत अधिकारांचे उल्लंघन करण्यात आले आहे. खटल्याचा निकाल काहीही लागो, लवकर कारवाई व्हायला हवी, हा राज कुंद्राचा अधिकार आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की, राज कुंद्रा विरुद्ध कोणताही ठोस आरोप नाही आणि त्यामुळेच खटला चालवण्यास विलंब होत आहे."

प्रशांत पाटील निवेदनात पुढे म्हणतात, "फिर्यादी पक्षाच्या अशा जाणुनबुजून कृतीमुळेच आपल्या देशात प्रलंबित प्रकरणांची संख्या खूप जास्त आहे. निष्पाप लोक कोणत्याही न्याय्य चाचणीशिवाय त्रस्त आहेत. एजन्सींना केवळ आरोप करणे आणि मीडिया ट्रायल करण्यातच रस आहे."

दरम्यान तुरुंगातून परत आल्यानंतर राज कुंद्राने 'UT 69' हा चित्रपट बनवला आहे, ज्यामध्ये त्याचा तुरुंगातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फ्लॉप ठरला.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com