Raj Kundra : पाॅर्न प्रकरणातून राज कुंद्राला हवी सुटका, न्यायालयाकडे केली मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra

पाॅर्न प्रकरणातून राज कुंद्राला हवी सुटका, न्यायालयाकडे केली मागणी

Raj Kundra Case : बाॅलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रावर पाॅर्न चित्रपट बनवणे आणि ती ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवर विकण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे कुंद्रा चर्चेत आला होता. त्यानंतर राज कुंद्रा (Raj Kundra) काही काळ तुरुंगातही होता. आता त्याने या आरोपातून सुटका करण्याची मागणी न्यायालयात केली आहे.

हेही वाचा: ब्रह्मास्त्रने रचला इतिहास! पहिल्या दिवशी बाॅक्स ऑफिस कलेक्शन झाले इतके

मात्र हे इतके सोपे नाही. राज कुंद्राचे खटल्यातून नाव काढण्याच्या मागणीला सरकारी वकीलने विरोध केल्याचे वृत्त आहे. सरकारी वकील म्हणाले, राज कुंद्रा हे प्रत्यक्ष या पाॅर्नोग्राफीच्या उद्योगाशी जोडले गेले होते. त्याविषयी पुरावेही उपलब्ध असून त्यातून सिद्ध होते के ते दोषी आहेत. (Entertainment News)

हेही वाचा: तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेची फजिती; मंडळाने रोखलं अन्..

सरकारी वकीलाने न्यायालयात दाखल केलेल्या जबाबावर राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील म्हणाले, आम्ही केस प्रकरणी युक्तिवाद करण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास असून सत्य समोर येईल. कुंद्रा सामिल असल्याचा कोणताच पुरावा नाही. न्यायालयात यावर युक्तिवाद करु असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Raj Kundra Files Dicharge Petition From Unwanted Act Case

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..