राजची 'इंटरनॅशनल डील',121 पोर्न व्हिडिओ 9 कोटींना विकण्याची होती तयारी

बॉलीवूड सेलिब्रेटी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येताना दिसते आहे.
Shilpa Raj 5
Shilpa Raj 5

मुंबई - बॉलीवूड सेलिब्रेटी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येताना दिसते आहे. त्यानं गेल्या काही दिवसांपूर्वी जी इंटरनॅशनल डील केली होती. त्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे वेगानं तपास सुरु केला आहे. या घटनेत ताजी घडामोड म्हणजे त्याच्या पत्नीच्या घरी मुंबई क्राईम ब्रँचनं छापा टाकला आहे. दिवसेंदिवस राजची डोकेदुखी वाढत चालली आहे. आता त्याच्याविषयीची जी माहिती मिळाली आहे ती चक्रावून टाकणारी आहे. (raj kundra international deal preparing to sell 121 porn videos for 8 crores and 93 lakhs yst88)

मुंबई क्राईम ब्रँचकडून आलेल्या माहितीनुसार, राज हा एक मोठी इंटरनॅशनल डील करणार होता. त्याच्याविषयीची एक लिंक आमच्या हाती आली आहे. राज हा त्याच्याकडे असलेल्या 121 पॉर्न व्हिडिओला 8 कोटी 93 लाख 22 हजारात विकण्याचा विचार करत होता. याची माहिती पोलिसांना राज कुंद्राच्या बँक ऑफ युनायटेड आणि बँक ऑफ आफ्रीकेमधून केलेल्या ट्रान्झेक्शनमधून पुढे आली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी राज सोबत काम करणाऱ्या काही अभिनेत्रींनी त्याच्यावर आरोप केले होते.

पुनम पांडे आणि शर्लिन चोप्रा यांनी राज आम्हाला धमकावून अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करुन घेत असल्याचा आरोप केला होता. आता राजच्या बँक खात्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली आहे. पोलिसांना संशय असा आहे की, त्यानं हे पैसे बेटिंगमधून कमावले की पॉर्न व्हिडिओमधून कमावले, याचे उत्तर ते शोधत आहेत. 21 जुलैला राजला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलीस त्याच्या गुन्ह्याबाबत बारकाईनं तपास करताना दिसत आहे.

Shilpa Raj 5
'पॉर्न नव्हे, विशिष्ट वर्गासाठी शॉर्टफिल्म्स'; राज कुंद्राची हायकोर्टात धाव
Shilpa Raj 5
'आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही', भरत जाधवचं मदतीचं आवाहन

मुंबई क्राईम ब्रँचनं राजचा अनेक डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा डेटा जेव्हा राजला अटक करण्यात आली तेव्हाच डिलिट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी वियान कंपनीच्या एका आयटी डेव्हलपरचे स्टेटमेंटदेखील रेकॉर्ड केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com