'पॉर्न नव्हे, विशिष्ट वर्गासाठी शॉर्टफिल्म्स'; राज कुंद्राची हायकोर्टात धाव

शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून विशिष्ट इच्छुक लोकांसाठी कंटेंट तयार केलेला आहे, असा याचिकेत बचाव
raj kundra
raj kundra

पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्राने Raj Kundra पोलीस कोठडी रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. जो कंटेंट पोलीस अश्लील म्हणून दाखवत आहेत तो थेट अश्लील वर्तन नसून एका विशिष्ट इच्छुक वर्गासाठी तयार केलेल्या शॉर्टफिल्म्स आहेत, असा दावा कुंद्राने केला आहे. मुंबई पोलिसांनी कुंद्रावर भादंवि 354 (क), 292 (अश्लील चित्रीकरण), 420 फसवणूक, आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67, 67अ ( अश्लील कंटेंट पाठविणे ), आणि महिलांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांडही बेकायदेशीर आहे असा दावा कुंद्राने केला आहे. (Raj Kundra moves to high court says arrest over porn film allegation illegal slv92)

raj kundra
राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली पोस्ट

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लावलेले आरोपही चुकीचे असून त्याप्रमाणे कोणतेही कृत्य केलेले नाही, असा बचाव याचिकेत केला आहे. विशेष म्हणजे जो कथित कंटेंट अश्लील म्हणून पोलिसांकडून दाखवला जात आहे, तो कोणताही थेट अश्लील वर्तन किंवा अश्लील संबंध नाहीत. उलट हा कंटेंट शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून दाखविला असून तो त्या मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे, असा दावा यामध्ये केला आहे. त्यामुळे जरी पोलिसांनी केलेला दावा खरा मानला तरी हा आरोप कलम 67 मध्ये येऊन जामिनपात्र गुन्हा होतो, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ता. 20 रोजी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला पोलीस रिमांडचा आदेश रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

कुंद्राला आणि त्याचा साथीदार रायन थार्प यांना 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे शाखेने कुंद्राला यामध्ये मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते आणि हॉटशॉट्स अॅप्सच्या माध्यमातून हा प्रकार चालविला जात होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com