esakal | 'राज कुंद्रामुळेच अ‍ॅडल्ट क्षेत्रात,व्हिडिओसाठी द्यायचा 30 लाख'
sakal

बोलून बातमी शोधा

'राज कुंद्रामुळेच पॉर्न क्षेत्रात,व्हिडिओसाठी द्यायचा 30 लाख'

'राज कुंद्रामुळेच पॉर्न क्षेत्रात,व्हिडिओसाठी द्यायचा 30 लाख'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या पतीला मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी अटक केली. आणि त्यामुळे मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजला 23 जुलैपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे. मात्र दुसरीकडे त्याच्यावर पुन्हा वेगवेगळे आरोप होताना दिसताहेत. त्यात अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि पुनम पांडे यांच्या नावाचा समावेश आहे. (raj kundra sherlyn chopra ponography controvery sherlyn raj kundra for bringing her in adult industry yst88)

शर्लिन आणि पुनमनं सायबर पोलिसांकडे राजच्या विरोधात तक्रार दिली आहे. वास्तविक यापूर्वीच त्यांनी ही तक्रार दिली होती. त्यात राज आपल्याला पैसे देऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तयार करत असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातून पुन्हा एकदा राजचे नाव समोर आले आहे. मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये राजच्या विरोधात पोर्नोग्राफीशी संबंधीत चित्रपट बनविणे आणि ते व्हिडिओ अपलोड करणे यासाठी गुन्हा दाखल केला होता. 26 मार्च रोजी यासंबंधीत मुंबई पोलिसांनी एकता कपूरचे स्टेटमेंटही घेतले होते.

हेही वाचा: 'माऊली माऊली'! विठ्ठलाच्या भक्तीत अमृता झाली दंग; पहा व्हिडीओ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे राजच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे, शर्लिन चोप्रानं सर्वप्रथम राजचे नाव घेतले होते. शर्लिनला अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये आणण्याचे श्रेय राजला आहे. अशी चर्चा यापूर्वी होती. त्यानं शर्लिनला प्रत्येक प्रोजेक्टसाठी 30 लाख रुपये दिले होते. शर्लिनचे असे म्हणणे आहे की, तिनं राजसाठी 15 ते 20 प्रोजेक्ट केले आहेत.

loading image