तोंड लपवून फिरतोय राज कुंद्रा, नेटकरी म्हणाले 'स्वस्तातला डेडपूल' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raj kundra

तोंड लपवून फिरतोय राज कुंद्रा, नेटकरी म्हणाले 'स्वस्तातला डेडपूल'

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)चा नवरा बिझनेसमॅन राज कुंद्रा(Raj Kundra) अश्लीम फिल्म निर्मिती प्रकरणामुळे चांगलाच वादातीत चर्चेत सापडला होता. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच टीमनं अश्लिल फिल्म बनवणं आणि त्याचं वितरण करणं या आरोपाखाली अटक देखील केली होती. त्यानंतर दीड-दोन महिने जेलची हवा खाल्ल्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. सध्या राज कुंद्रा कुटुंबासोबत फिरत असला तरी त्याला सहज ओळखता येणार नाही. कारण तो काहीसा विचित्र अवतार करुन फिरत आहे. या विचित्र लूकमधला राज कुंद्राचा व्हिडीओ कालपासून जोरदार व्हायरल होतोय. यावेळी नेटकऱ्यांनी राज कुंद्राची खिल्ली उडवली दिसते.

हेही वाचा: Shiv subramaniam : अभिनेते शिव सुब्रमण्यम यांचे निधन, मुलाचेही नुकतेच..

रविवारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी,बहीण शमिता त्यांची आणि आई आणि राज कुंद्रा एका चित्रपट गृहाच्या बाहेर दिसले. यावेळी ते गाडीतून उतरत होते, गाडीचे दार उघडताच राज कुंद्रा कोणतीही पोज न देता, काहीही न बोलता थेट सिनेमागृहाकडे गेला. त्या पाठोपाठ शिल्पा आणि तिचे कुटुंबीयही गाडीतून उतरले. सिनेमागृहाजवळ येताच राज कुंद्रा थेट लिफ्ट मध्ये शिरला. यावेळी राज कुंद्राची होणारी त्रेधा आणि अवतीभवती असणाऱ्या माध्यम प्रतिनिधींच्या नजरा यामुळे तिला हसू आवरलं नाही.

हेही वाचा: सारा म्हणतेय 'चलो दिलदार चलो...' तर इब्राहीम... 

यावेळी काहींनी त्याला मुद्दाम अडवण्याचा प्रयत्न केला. नेटकऱ्यांमधील काहींनी त्याची खिल्ली उडवली आहे. हॉलिवूड मधील 'डेडपूल' या गाजलेल्या चित्रपटाशी त्याची तुलना करण्यात आली. या चित्रपटातील हिरोप्रमाणेच राज कुंद्रा यांनी अवतार केला असल्याने एकाने त्यांना 'स्वस्तातला डेडपूल' असे संबाधले आहे. राज कुंद्रा यावेळी काळे जॅकेट, काळा फेस मास्क परिधान करून जॅकेटच्या कॅपने डोके झाकून घेतले आहे. त्याचा हा अवतार अत्यंत विनोदी वाटत असल्याने कालपासून हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेकांनी खिल्ली उडवणाऱ्या कमेंट दिल्या आहेत. तर काहींनी अश्लील चित्रफीत प्रकरणाची आठवण करून देत राजवर टीकाही केली आहे.

Web Title: Raj Kundra Spotted Like

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..