अभिनेता शिव सुब्रमण्यम यांचे निधन |actor shiv subramaniam passed away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shiv subramaniam

Shiv subramaniam : अभिनेते शिव सुब्रमण्यम यांचे निधन, मुलाचेही नुकतेच..

bollywood : हिंदी चित्रपटातील लोकप्रीय अभिनेते आणि स्क्रीनराइटर शिव सुब्रमण्यम (shiv subramaiam) यांचे सोमवारी निधन झाले आहे. त्यांनी सिनेमा, मालिका, नाटक या तिन्ही क्षेत्रात उभूतपूर्व काम केले होते. 'टू स्टेट्स' या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली. 'परिंदा' आणि 'हजारो ख्वाइशे ऐसी' या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता. गेल्यावर्षी नेटफल्किसवर आलेला 'मीनाक्षी सुंदरेश्वर' हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्याच्या निधनाने बॅालिवूडवर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Brahmastra song teaser: 'केसरिया' आलिया - रणबीरचा रोमँटिक अंदाज

दोन महिन्यांपूर्वीच मुलाचा मृत्यू...

शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल चित्रपट निर्मात्या बिना सरवर यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरद्वारे शिव सुब्रमण्यम यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाचे (जहान) यांचे ब्रेन ट्युमरने निधन झाल्याची माहिती त्यांनी उघड केली. तो अवघ्या १६ वर्षांचा होता. त्याच्या १६ व्य वाढदिवसानंतरच त्याचे निधन झाले होते. शिवकुमार सुब्रमण्यम यांच्या पार्थिवावर ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मोक्षधाम हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Actor Shiv Subramaniam Passes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..