THE FAMILY MAN 2 : चेल्लम सरांची निर्माते राज यांनी केली पोलखोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

THE FAMILY MAN 2 : चेल्लम सरांची निर्माते राज यांनी केली पोलखोल

THE FAMILY MAN 2 : चेल्लम सरांची निर्माते राज यांनी केली पोलखोल

सध्या सर्वत्र THE FAMILY MAN 2 ची जोरदार चर्चा सुरु आहे. अपेक्षेप्रमाणे पहिल्या सीझनप्रमाणे दुसरा सीझनही रंगतदार ठरला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची पसंती या वेबसीरिजला लाभली आहे. 'द फॅमिली मॅन २' मध्ये मनोज वाजपेयी आणि समंथा अक्किनेनी भूमिकांसोबत चेल्लम सरांच्या भूमिकेचेही सर्वांनी कौतुक केले. उदय महेश यांनी साकारलेले चेल्लम सरांचे पात्रही हिट ठरले आहे. दरम्यान, द फॅमिली मॅनचे को- क्रिएटर राज निदीमोरू यांनी नुकताच एका मुलाखतीदरम्यान, खुलासा केला की, चेल्लम सर या पात्रासाठी सुरवातीला वेगळ्या अॅक्टरला कास्ट केले होते पण तो काम करु शकला नाही. त्यानंतर चेल्लमची भूमिका उदय महेश यांनी साकारली. (Raj Nidimoru says another actor was originally cast as Chellam sir in The Family Man 2 It just wasn’t working out)

सोशल मीडियावर चेल्लम सरांविषयी चर्चा होत असून त्यांच्यावर काही मीम्सही बनवण्यात आले आहेत. 'द फॅमिली मॅन २' मध्ये 'चेल्लम सर' या पात्राची भूमिका फार मोठी नसली तरी श्रीकांत तिवारीला मोलाची मदत केली. सोशल मीडियावर चाहते 'चेल्लम सरांना' गुगल, विकिपीडिया ठरवून मोकळे झाले आहेत. वेबसीरिजमध्ये हे चेल्लम सर निवृत्त एनआयए अधिकारी दाखवले आहेत. द फॅमिली मॅनचे निर्माते राज निदीमोरू आणि कृष्णा डिके, यांना राज आणि डिके म्हणून ओळखले जाते. अॅमझॉन प्राईमवर या महिन्याचा सुरवातीस द फॅमिली मॅनला मिळालेल्या सकारात्मक समीक्षा आणि प्रेक्षकांच्या दिलेल्या उत्फूर्त प्रतिसादाबाबत संवाद साधतानाचा राज आणि डिके या जोडीचा व्हिडिओ प्रसिध्द झाला आहे. द फॅमिली मॅन शोमध्ये श्रीकांत तिवारीची भूमिका साकाणाऱ्या मनोज वाजपेयीला दहशतवादी हल्ला रोखण्यात मदत करणाऱ्या चेल्लम सर या पात्राबाबत सगळीकडे खूप चर्चा झाली.

राज म्हणाले, ''चेल्लम या पात्रासाठी सुरवातीला वेगळा अॅक्टरला घेतले होते पण तो काम करु शकला नाही. त्यानंतर चेल्लमची भूमिका उदय महेश यांनी साकारली.'' ''एक मजेशीर गोष्ट म्हणजे बर्‍याच लोकांना माहित नाही की आम्ही दुसर्‍या अभिनेत्याला प्रत्यक्षात कास्ट केले आणि थोडा भाग शूट केला होता. फक्त शॉटच नव्हे तर पुढील शुटींगची तयारी देखील करत होतो पण ते योग्य वाटत नव्हते. तो व्यक्ती आजारी असल्यामुळे म्हणून ते पात्र साकारू शकला नाही. बिचाऱ्याची तब्येत ठिक नव्हते. त्याला काहीच माहीत नव्हते काय सूरू आहे. मला वाटते, त्यांनी बराच काळ अभिनय केला नव्हता त्यामुळे तो काम करु शकला नाही. आम्हाला खूप वाईट वाटले होते आणि कळत नव्हते काय करावे. तो व्यक्तीने स्वत:च माफी मागितली कारण तो काम करु शकत नव्हता.''असेही राज यांनी यावेळी सांगितले

द फॅमिली मॅन २ मधील हे चेल्लम सर खऱ्या आयुष्यात कोण आहेत, ते आपण जाणून घेण्यासाठी क्लिक करा