ती वडिलांना व्हिडीओ कॉल करीत म्हणाली,''मला शेवटचं पाहून घ्या''

प्रसिद्ध मॉडेलने हॉटेलच्या ६ व्या मजल्यावरून उडी मारत केला आत्महत्येचा प्रयत्न
Model Gungun Upadhyay
Model Gungun UpadhyayGoogle
Updated on

राजस्थानमधील(Rajasthan) जोधपूर शहरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. एका प्रसिद्ध फॅशन मॉडेलने राहत असलेल्या हॉटेल्या सहाव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न (attempt to suicide) केल्याचं वृत्तं आहे. त्या मॉडेलचे(Model) नाव गुनगुन उपाध्याय असल्याचं सजतंय. ती १९ वर्षांची आहे. जोधपूर मधील रतनदा भागातील हॉटेल लॉर्ड्समध्ये ती उतरली होती. खरंतर ती जोधपूरचीच रहवासी आहे. शनिवारी ती उदयपूरहून जोधपूरमध्ये आली होती. त्याच रात्री तिनं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. गुनगुनने(Gungun Upadyay) हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारण्यापूर्वी वडिलांना फोन केला आणि ती आत्महत्या करणार असल्याचं सांगितले. तसंच,तिनं वडिलांना शेवटचे मला पाहून घ्या म्हणत तिच्या चेहऱ्याकडे पाहण्यास सांगितले. आपल्या मुलीचं असं बोलणं ऐकल्यानंतर अर्थातच वडिलांना धक्का बसणं स्वाभाविक होतं.

Model Gungun Upadhyay
Big boss: सलमानच्या रीलेशनशीप स्टेट्सविषयी मोठा खुलासा

तिच्या वडिलांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसही ती मॉडेल वास्तव्यास असलेल्या हॉटेलचा शोध घेत तिथे पोहोचले. मात्र,ते तिथे पोहोचण्यापूर्वीच तिनं उडी मारली होती. गुनगुनला जखमी अवस्थेत ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्या पायाला आणि छातीला जबदस्त मार लागला आहे. तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अद्याप गुनगुनच्या आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही. ती सध्या बेशुद्धावस्थेत आहे. ती शुद्धीवर आल्यानंतर तिच्या आत्महत्ये मागील कारण समजू शकेल असं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com