
Big boss: सलमानच्या रीलेशनशीप स्टेट्सविषयी मोठा खुलासा
सलामान खान(Salman Khan) हे बॉलीवूडमधलं मोठं प्रस्थ. एखाद-दुसरा सिनेमा सोडला तर त्याचा प्रत्येक सिनेमा हा केवळ त्याच्या नावावर चालतो. मग त्या सिनेमाचं कथानक,त्यातला अभिनय सारं त्या दर्जाचं असो वा नसो. बरं हे सलमानला देखील चांगलं माहित आहे बरं का. पण आता लोकांचं प्रेम मिळत आहे तर तो नाकारेल कशाला. सध्या बिग बॉसमुळे सलमान प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला होता. त्या शो मधील त्याच्या सुत्रसंचालनाला गेली अनेक वर्ष पसंती मिळतेय म्हणूनच तर त्याची जागा तिथे अद्याप कुणी दुसऱ्या स्टारने घेतली नाही. बिग बॉस सिझन १५(Big boss 15) चा अंतिम सोहळा नुकताच पार पडला. शो ची विनर तेजस्वी प्रकाश ठरली; पण सोहळा गाजला तो यादरम्यान झालेल्या अनेक परफॉर्मन्समुळे आणि अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे.
हेही वाचा: तेजस्वी प्रकाश विनर कशी झाली?हे तर फिक्स्ड,ट्वीटरवर नवीन वाद सुरू....
'बिग बॉस १५' च्या अंतिम सोहळ्यात 'बिग बॉस १३' चा विनर ठरलेल्या पण आता आपल्यात हयात नसलेल्या सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहिली गेली. यासाठी खास शहनाझ गिलला,सिद्धार्थच्या खास मैत्रिणीला निमंत्रण दिलं होतं. शहनाझनं आल्या आल्याच सलमानला घट्ट मिठी मारली अन् तिला रडू कोसळलं. सलमानही यावेळी स्वतःला आवरू शकला नाही. सलमानला इतकं रडताना कदाचित अनेकांनी पहिल्यांदा पाहिलं असावं. सिद्धार्थच्या आठवणीत तेव्हा संपूर्ण वातावरणं भावूक झालेलं पहायला मिळालं. शहनाझला पंजाब की कटरिना कैफ असं सलमाननं आपल्या स्टाइलमध्ये हाक मारताच पुढे शहनाझने आपल्या बडबड्या स्टाईलमध्ये जो काही सलमानचा क्लास घेतला तेव्हा सलमानची झालेली हालत खरंच पहाण्यासारखी होती. पण तेव्हाच तो बोलता बोलता असं काही बोलून गेला की त्याची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
तर शहनाझ सलमानला म्हणाली,''आता मी इंडियाची शहनाझ गिल झाली आहे. हो,पण इंडियाची कटरिना कैफ आता पंजाबची कटरिना कैफ झाली आहे विकी कौशल सोबत लग्न करून. तुम्ही ठीक आहात ना?'' त्यावर सलमान म्हणाला,''सगळं कुशल मंगल होईल लवकरच''. तेव्हा शहनाझ पटकन म्हणाली कशी,''तुम्ही खुश रहा. सिंगल तुम्ही जास्त चांगले दिसता''. तेव्हा सलमान घाईघाईत बोलून गेला,''मी सिंगल झालो की खुश होईन''. तेव्हा शहनाझ म्हणाली,''अच्छा,तर तुम्ही कमिटेड आहात''. त्यावर सलमानचा चेहरा पाहिल्यावर मात्र राहून राहून वाटतंय कतरिनानंतर आता सलमान खान हे मोठं शाही थाटातलं लग्न पहायला मिळणार की काय. असो,सलमानला शुभेच्छा त्यासाठी.
Web Title: Salman Khan Saysi Am Not Singlein Front Of Shenaaz Gillbigg Boss 15 Entertainment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..