esakal | 'बिग बॉस १४' मधील ‘या’ स्पर्धकाला करावा लागला होता आर्थिक संकटाचा सामना
sakal

बोलून बातमी शोधा

shardul

'बिग बॉस १४' चा स्पर्धक शार्दुल पंडित याला देखील आर्थिक फटका सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

'बिग बॉस १४' मधील ‘या’ स्पर्धकाला करावा लागला होता आर्थिक संकटाचा सामना

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- 'बिग बॉस १४' मध्ये रविवारी पार पडलेल्या एविक्शनमधून शार्दुल बचावला आणि नैनाची एक्झिट झाली. शार्दुलने नुकताच त्याचा लॉकडाऊनमधला अनुभव शेअर होता. कोरोना व्हायरच्या संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. या काळात अनेक उद्योग-व्यवसाय ठप्प झाले. या लॉकडाऊनचा फटका  मनोरंजनविश्वालाही बसला. मालिका, सिनेमांच शुटींग, प्रदर्शन, प्रमोशन सगळंच जैसै थे थांबवावं लागलं. परिणामी मनोरंजन विश्वातील अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. यात काही कलाकारांनादेखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यातच 'बिग बॉस १४' चा स्पर्धक शार्दुल पंडित याला देखील आर्थिक फटका सहन करावा लागल्याचं पाहायला मिळालं. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.

हे ही वाचा: साऊथ मेगास्टार चिरंजीवी कोरोना पॉझिटीव्ह  

शार्दुलने लॉकडाउनमध्ये त्याला जी संकटं आली त्यावर भाष्य केलं. या काळात अभिनेता करण पटेल आणि अंकिता भार्गव पटेल या दोघांनी त्याला मदत केल्याचं त्याने सांगितलं. “लॉकडाऊनच्या काळात हातात कोणतंच काम नव्हतं. त्यामुळे मला थोड्या आर्थिक संकटांना सामोरं जावं लागलं. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी माझ्याकडे साधे प्रोटिन शेक घेता येईल इतके देखील पैसे नव्हते. त्यामुळे मला या शोमध्ये प्रोटीन शेक न घेताच यावं लागलं”, असं शार्दुल म्हणाला. 

शार्दुल पुढे म्हणतो, “तो काळ खरंच फार बिकट होता. मी कोणाताही स्टार नाही, माझ्यावर अशी वेळ आली होती की मी स्वत:ला कोंडून घेतलं होतं, मला सतत रडायला येत होतं. माझे अनेक मित्र आहेत, पण माझी अशी अवस्था होती की त्यांच्याशी बोलताना देखील मला लाज वाटत होती. अनेकदा माझे मित्र मला सिनेमा पाहण्यासाठी बोलवायला येत होते. पण, एका सिनेमासाठी ३५० रुपये खर्च होतील हा विचार करुनच मला टेन्शन यायचं” अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

शार्दुल छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत 'बंदिनी', ‘गोद भराई’, ‘कितनी मोहब्बत है’ आणि ‘कुलदिपक’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.

shardul pandit says he entered bigg boss 14 house without protein shakes because he didnt have money