'बाबुमोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए!; 'आनंद'च्या रिमेकची घोषणा| Rajesh Khanna Amitabh Bachchan Anand Movie | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajesh Khanna Amitabh Bachchan Anand Movie

'बाबुमोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिए!; 'आनंद'च्या रिमेकची घोषणा

Anand Remake after 51 Year: बॉलीवूडमध्ये एव्हरग्रीन चित्रपटांची जी यादी आहे त्यामध्ये नेहमीच ऋषीकेश मुखर्जी यांच्या आनंद या चित्रपटाचं नाव घेतलं जातं. (bollywood movie) सुपरस्टार राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, रमेश देव, सीमा देव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं (Bollywood Actor) होतं. आजही हा चित्रपट आवडणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. त्यातील संवाद, गाणी प्रेक्षकांच्या चर्चेचा हमखास विषय असतो. आनंद पुन्हा (Amitabh bachchan) चर्चेत येण्याचे कारण म्हणजे तब्बल 51 वर्षानंतर या चित्रपटाचा रिमेक प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यानिमित्तानं पुन्हा एकदा आनंदच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.

बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो त्या राजेश खन्ना यांना आनंदनं मोठं यश मिळवून दिलं होतं. त्यांच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली होती. तेव्हा अफाट कीर्ती मिळवणाऱ्या राजेश खन्ना यांच्या चित्रपट कारकीर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक म्हणजे आनंद हा चित्रपट. आनंदमध्ये राजेश खन्ना यांनी एका कॅन्सर पीडिताची भूमिका केली होती. तर अमिताभ हे डॉक्टरच्या भूमिकेत होते. डॉक्टर आणि रुग्ण त्यांच्यातील मैत्रीचं नातं. आनंदचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन या साऱ्या गोष्टी मुखर्जी यांनी प्रभावीपणे आनंदमधून मांडल्या होत्या. आता आनंदच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी आहे. ती म्हणजे या चित्रपटाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

1971 मध्ये आलेल्या आनंद या चित्रपटातील संवाद लेखन प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी केले होते. चित्रपट समीक्षक तरण आदर्शनं ट्विट करुन ही माहिती दिली आहे. निर्माता एन सिप्पी यांचे नातु समीर सिप्पी हे विक्रम खाखर यांच्यासोबत या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. पुढील दिवसांत आनंदचे दिग्दर्शक कोण असणार, त्यामध्ये कुणाच्या भूमिका असणार याविषयीची माहिती थोड्याच दिवसांत जाहीर केली जाणार आहे.