देशभरात 'खिलाडी-थलैवा'ची धूम; 2.0 प्रदर्शित

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित, बहुप्रदर्शित 2.0 चित्रपट आज (गुरुवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमारचीही भूमिका आहे. 2.0 हा चित्रपट आज पहाटे चारपासून विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

एस. शंकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले तर अल्लीराजाह सुबास्करन आणि के. करूणामूर्थी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 2.0 हा चित्रपट सुमारे 512 कोटी रुपयांचा बजेट असलेला पहिला चित्रपट असणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला होता. या ट्रेलरचा लाँचिंग कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यानंतर आज अखेर हा चित्रपट रिलिज झाला. पहाटे चारपासूनच या चित्रपटासाठी मोठी गर्दी झाली होती.

रजनीकांत यांच्या विविध चित्रपटांसाठी गर्दी होत असते. यापूर्वी रजनीकांत यांचा 'रोबोट'लाही मोठे यश मिळाले होते. या रोबोटनंतर त्याचा सिक्वल म्हणून 2.0 चित्रपटाकडे पाहिले जात आहे. 2.0 चित्रपटात अॅमी जॅक्सनने यामध्ये भूमिका केली आहे. 2.0 हा चित्रपट आजपर्यंतचा सर्वांत मोठा बजेट असलेला चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.  2.0 हा चित्रपट नक्कीच मोठी कमाई करेल, असा विश्वास दिग्दर्शक, निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajinikanth and Akshay Kumars 2 point 0 movie Released