Rajnikant Wedding Anniversary: मुलाखत घ्यायला आली, बायकोच झाली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं सर्वोच्च स्थान प्राप्त करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये रजनीकांत यांच्या नावाचा (Rajnikanth superstar) उल्लेख करावा लागेल.
Rajnikanth and lata Wedding Story
Rajnikanth and lata Wedding Story
Updated on

Tollywood News: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं सर्वोच्च स्थान प्राप्त करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये रजनीकांत यांच्या नावाचा (Rajnikanth superstar) उल्लेख करावा लागेल. साऊथ इंडस्ट्रीमध्ये ज्यांना देवाची उपमा दिली जाते असे अभिनेते म्हणून रजनीकांत यांची (Wedding Story) ओळख आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्यांच्या आयुष्याविषयीच्या काही गंमतीशीर (Entertainment News) आठवणी पाहणार आहोत. मोठ्या संघर्षांतून आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या रजनीकांत यांचा चाहतावर्ग हा जगभर पसरला आहे. केवळ भारतातच नाहीतर त्यांचे चित्रपट वेगवेगळ्या देशांमध्ये पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळते. अशा या अभिनेत्याची एक महिला पत्रकार मुलाखत घेण्यासाठी आली होती. त्याच महिलेच्या प्रेमात पडले. Rajinikanth And Latha Rangachari 40th wedding Anniversary share love story

आज रजनीकांत हे त्यांच्या लग्नाचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांच्या हटक्या लवस्टोरीबाबत फार कमी जणांना माहिती आहे. लता रंगाचारी(Latha Rangachari) यांच्यासोबत त्यांचा वैवाहिक प्रवास कसा होता हे आपण त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जाणून घेणार आहोत. 26 फेब्रुवारी 1981 रोजी त्यांचे लग्न झाले. रजनीकांत यांची लवस्टोरी हे देखील एका चित्रपटाची कथा असावी अशीच आहे. (Rajinikanth And Latha Rangachari Love Story) 1979 मध्ये आलेल्या गोलमाल या हिंदी चित्रपटाचा तमिळ रिमेक तयार करण्यात आला होता. थिल्लु मल्लु या नावानं तयार करण्यात आलेल्या चित्रपटामध्ये रजनीकांत यांची प्रमुख भूमिका होती. चित्रिकरणाच्या वेळी एक महिला पत्रकार रजनीकांत यांची मुलाखत घेण्यासाठी आली होती. ती मुलाखत रजनीकांत यांच्यासाठी लवस्टोरी ठरली.

Rajnikanth and lata Wedding Story
Viral Video : पाणीपुरीचा शेक कसा पिणार! हाईटच झाली राव

लता रंगाचारी यांनी रजनीकांत यांची मुलाखत घेतली होती. लता या इतिराज महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी होत्या. त्यांना त्यांच्या एका मासिकासाठी रजनीकांत यांची मुलाखत हवी होती. त्यानंतर त्यांनी रजनीकांत यांच्याशी संपर्क साधला. या मुलाखतीतून रजनीकांत हे लता यांच्या प्रेमात पडले. मुलाखत संपल्यानंतर रजनीकांत यांनी त्याचवेळी लता यांना प्रपोझ केले. आणि लग्नाविषयी विचारले. त्यावेळी लता यांना धक्का बसला. त्यांनी तेव्हा तातडीनं उत्तर न देता आई वडिलांना विचारुन आपल्याला सांगते असे उत्तर दिले होते. अशी आठवण रजनीकांत यांनी एका मुलाखतीतून सांगितली होती.

Rajnikanth and lata Wedding Story
Video: 70 वर्षांच्या भीमाबाईंच्या उपहारगृहात हजारो मराठी पुस्तकांचा खजिना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com