Rajinikanth: रजनीकांत यांचा आवाज अन् फोटो वापरताय तर खबरदार... थेट जाल तुरुंगात

रजनीकांतचे चाहते जगभरातून आहेत. पण दरम्यान, रजनीकांत यांनी आपल्या वैयक्तिक अधिकारांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.
Rajinikanth
Rajinikanth Sakal

साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर रजनीकांत यांचे नाव टॉप लिस्टमध्ये समाविष्ट आहे. अभिनयविश्वाचा मास्टर म्हटला जाणारा रजनीकांत कोणत्याही वेगळ्या ओळखीवर अवलंबून नाही.

रजनीकांतचे चाहते जगभरातून आहेत. पण दरम्यान, रजनीकांत यांनी आपल्या वैयक्तिक अधिकारांच्या सुरक्षेसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्‍यामुळे अभिनेत्‍याचे नाव, आवाज, फोटो आणि काहीही विना परवानगी वापरल्‍यावर कठोर कारवाई होऊ शकते.

वृत्तानुसार, रजनीकांतचे वकील इलामभारती यांनी नोटीस जारी करून कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा दिला आहे. या अंतर्गत, जर कोणी अभिनेत्याच्या वैयक्तिक अधिकारांचा आणि परवानगीशिवाय सेलिब्रिटी म्हणून वापर केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

खरं तर, अनेकदा असे दिसून येते की काही लोक त्यांचे फॉलोअर्स, उत्पादने इत्यादी व्यावसायिकरित्या विकण्यासाठी सेलिब्रिटींचे नाव, फोटो, आवाज आणि प्रसिद्धी वापरतात. अशा परिस्थितीत आता रजनीकांत यांच्या वकिलाने बजावलेल्या या नोटीसनंतर ते तसे करू शकत नाहीत.

Rajinikanth
Shah Rukh Khan Pathaan: 'पठाण'च्या यशानंतर शाहरूखचं थेट चाहत्यांशी चॅटिंग.. म्हणाला, मी आकडे मोजत..

सुपरस्टार रजनीकांत यांचे नाव, फोटो आणि आवाज त्यांच्या परवानगीशिवाय वापरल्याने त्यांचे चाहते आणि लोकांमध्ये गोंधळ आणि फसवणूक होऊ शकते, असा इशारा रजनीकांतच्या वकिलाने जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये दिला आहे.

काही प्लॅटफॉर्म त्यांची उत्पादने विकण्यासाठी आणि लोकांना भुरळ घालण्यासाठी त्यांची नावे आणि फोटो यासारख्या वैयक्तिक गोष्टींचा गैरवापर करतात. आता त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. रजनीकांत येत्या काळात जेलर या चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com